इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी मुंबई दौऱ्यावर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ‘मातोश्री’ निवासस्थानी दुपारी ही भेट होणार आहे.

त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतील. या दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर दुपारी साडे तीनच्या सुमारास ते राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना भेटतील आणि पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर रात्री दिल्लीला रवाना होतील, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

‘इंडिया’च्या सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत चुरस; महाराष्ट्रात फोनाफोनी

उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक होत आहे. भाजपप्रणित एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत एनडीएच्या नेत्यांनी दिले होते. मात्र उमेदवार ठरवताना विचारात न घेतल्याने इंडिया आघाडीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व एकमताने उमेदवार दिला. ‘इंडिया’नेही दाक्षिणात्य उमेदवार दिल्याने विरोधी पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा भाजपचा डाव फसला आहे. त्यातच इंडिया आघाडीने निवडणुकीसाठी भक्कम मोर्चेबांधणी केल्यामुळे एनडीएला विरोधी पक्षांच्या विनवण्या कराव्या लागत आहेत.

ज्याच्याकडे सुदर्शन, विजय त्याचाच! शिवसेनेचा रेड्डी यांच्या उमेदवारीला पाठिंबा

Comments are closed.