अमेरिकेच्या टॅरिफमुळे शेअर बाजार संभ्रमात; तेजीने सुरुवात करत निर्देशांक ढेपाळला
शेअर बाजारात शुक्रवार हा आठवड्याच्या आणि या महिन्याच्या व्यवहाराचा शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी बाजारात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता दिसून आली. तसेच निर्देशांकात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. अमेरिकेतील टॅरिफमुळे दोन दिवसांत शेअर बाजारात मोठी विक्री दिसून आली, त्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मात्र, शुक्रवारी बाजार वाढीसह उघडला. सकाळी ९:२२ वाजता, बीएसई सेन्सेक्स ११२ अंकांनी वाढून ८०,१९३.२५ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५०.४५ अंकांनी वाढून २४,५४५.९० वर पोहोचला. मात्र, त्यानंतर ही तेजी टिकली नाही आणि निर्देशांक पुन्हा ढेपाळात असल्याचे दिसून आले.
सकाळी ९.४० वाजता बीएसई सेन्सेक्स ६२ अंकांनी आणि निफ्टी १० अंकांनी वधारला. शुक्रवारी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही विक्री दिसून आली. बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी १५ शेअर्स जास्त आणि १५ शेअर्स कमी व्यवहार करत होते. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये २.६४ टक्क्यांची सर्वात मोठी घसरण दिसून आली. दुसरीकडे, ट्रेंट शेअर्समध्ये ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
शेअर बाजारातील चढउतारांमध्ये, काही शेअर्स देखील चांगल्या गतीने राहिले. अॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीजचे शेअर्स १० टक्क्यांनी वाढून ३५९ रुपयांवर व्यवहार करत होते. आरबीएल बँकेचे शेअर्स ३.८५ टक्क्यांनी वाढून २६० रुपयांवर पोहोचले. कार्ट्रेड टेकचे शेअर्स ४.२१ टक्क्यांनी वाढले. कोलगेटचे शेअर्स २ टक्के, ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स जवळपास ३ टक्के आणि येस बँकेचे शेअर्स २.४६ टक्क्यांनी वधारले. बीएसईवर ४८ शेअर्समध्ये लोअर सर्किट आणि ८४ शेअर्समध्ये अपर सर्किट झाले. याशिवाय, एकूण ३,३९५ व्यवहार झालेल्या स्टॉकपैकी १,६३२ शेअर्समध्ये वधारले आणि १,५८५ शेअर्समध्ये घसरण झाली. याशिवाय, १७८ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
गेल्या दोन सत्रांमध्ये सेन्सेक्स १,५०० अंकांनी घसरला हे लक्षात घेण्यासारखे आहे. हा दबाव प्रामुख्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवर भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त शुल्क लादण्याच्या निर्णयाशी संबंधित चिंतेमुळे आला आहे. दंडात्मक उपाययोजना असूनही, भारतीय रिफायनरीज सप्टेंबरमध्ये रशियन तेल आयातीत वाढ होण्याची अपेक्षा करत आहेत, असे डीलर्स म्हणतात. या सर्व घडामोडीमुळे शेअर बाजारात आणखी काही काळ अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता व्रतवण्यात येत आहे.
Comments are closed.