महिलेच्या शरीरात या अवयवात वाढत होता गर्भ, डॉक्टरही झाले हैराण

आईच्या गर्भात बाळाची वाढ होते, हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण, उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या एका गर्भवतीची ही केस आहे. या महिलेच्या गर्भाशयाऐवजी शरीराच्या दुसऱ्या अवयवात गर्भाशयाची वाढ होत आहे. या महिलेच्या यकृतात चक्क 12 आठवड्यांचे बाळ आहे. तज्ज्ञांच्या मते, ही अतिशय दुर्मिळ केस आहे.

बुलंद शहरातील 30 वर्षीय ही महिला पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात तपासणी करत असताना झालेल्या टेस्टच्या माध्यमातून ही महिला 12 आठवड्यांची गरोदर असल्याचं निष्पन्न झालं आणि तिचं बाळ यकृतात वाढत असल्याचे समजले. या स्थितीला ‘हेपेटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी’ असे म्हणतात. आज आपण जाणून घेऊयात, एक्टोपिक प्रेगेन्सी म्हणजे काय

हेपेटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी –

साधारणपणे, गर्भधारणेची सुरुवात होते तेव्हा फलित अंडी गर्भाशयात पोहोचतात आणि तेथे त्यांची वाढ होते. पण, एक्टोपिक प्रेगेन्सीमध्ये अंडी गर्भाशयाच्या बाहेर फॅलोपियन ट्युबमध्ये वाढतात.

लक्षणे कोणती –

  • पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना होणे.
  • योनीतून रक्तस्त्राव
  • मळमळ आणि उलट्या आदी

लिवरमध्ये बाळ का वाढू शकत नाही?

लिवर प्रेग्नेन्सीसाठी नाही. यात बाळाची वाढ होण्यासाठी पुरेशी जागा नसते. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेत महिलेच्या जीवाची सुरक्षितता लक्षात घेत डॉक्टरांनी गर्भ पाडला होता.

तज्ज्ञ काय सांगतात?

डॉक्टरांच्या मते, गर्भाशयाबाहेर गर्भाचा विकास अत्यंत धोकादायक असतो. त्यामुळे याच्यावर वेळेवर निदान होऊन उपचार होणे आवश्यक आहे. यकृतामध्ये नाजूक आणि मोठ्या रक्तवाहिन्या असतात. जेव्हा गर्भ यकृताच्या पृष्ठभागावर वाढू लागतो तेव्हा नसांना नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरात गंभीर अतंर्गत रक्तस्त्रान होऊ शकतो. ज्यामुळे महिलेचा जीव धोक्यात येऊ शकतो.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=3_gvyhetu

Comments are closed.