आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया स्पॉन्सरशिवाय खेळणार का? मोठी अपडेट समोर!
बीसीसीआय आणि ड्रीम-11 यांच्यातील जर्सी स्पॉन्सरची डील संपली आहे. ही डील 2023 ते मार्च 2026 पर्यंत ठरली होती. पण ऑनलाईन गेमिंग सुधारणा कायदा 2025 मुळे ड्रीम-11 ला मोठं नुकसान झालं. त्यामुळे ड्रीम-11 ने बीसीसीआयसहचा करार वेळेआधीच संपवला. आता बीसीसीआयला (BCCI) टीम इंडियासाठी (Team india) नवा जर्सी स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. आशिया कप 2025 (Asia Cup 2025) सुरू होण्याआधीच टीम इंडियाच्या जर्सी स्पॉन्सरवर मोठी अपडेट समोर आली आहे.
ड्रीम-11 नंतर बीसीसीआय नवा जर्सी स्पॉन्सर शोधत आहे. पण अजून काहीही स्पष्ट झालेले नाही. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघ उतरत आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, या स्पर्धेत टीम इंडिया जर्सी स्पॉन्सरशिवाय खेळणार आहे. कारण बीसीसीआयला अजून नवा स्पॉन्सर मिळालेला नाही. सध्या तरी बीसीसीआयच्या बाजूनेही काही अधिकृत घोषणा झालेली नाही.
केंद्र सरकारने ऑनलाईन मनी गेमिंग सुधारणा दोन भागांत विभागली आहे, ई-स्पोर्ट्स गेमिंग, ऑनलाईन मनी गेम यामध्ये मनी गेमिंगला मोठा धक्का बसला आहे. कारण सरकारने असे अॅप्स बंदी घातली आहेत, ज्या अॅप्समध्ये यूजर्ससोबत पैशांची देवाणघेवाण होत होती. नवीन कायद्यामुळे हे व्यवहार थांबवावे लागले. याचा मोठा परिणाम ड्रीम-11 वर झाला. त्यामुळे ड्रीम-11 नेही आपल्या यूजर्ससोबत पैशांचं व्यवहार करणं पूर्णपणे थांबवलं आहे.
Comments are closed.