ड्रीम 11 च्या जागी कोणता नवा स्पॉन्सर येणार? आशिया कपमध्ये टीम इंडियाची जर्सी कशी दिसणार? मोठी अपडेट समोर
टीम इंडियाला (Team india) आशिया कपपूर्वी (Asia Cup) नवा जर्सी स्पॉन्सर हवा आहे. कारण नुकतंच फॅन्टसी स्पोर्ट्स कंपनी ‘Dream11’ ने बीसीसीआयसोबतचा करार संपवला आहे. देशात ऑनलाइन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन बिल 2025 लागू झाल्यानंतर रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म्स वर बंदी घालण्यात आली. यामुळे Dream11 ला माघार घ्यावी लागली. आता मोठा प्रश्न असा आहे की, आशिया कपच्या आधी टीम इंडियाच्या जर्सीवर नवा स्पॉन्सर कोण असेल?
ड्रीम 11 ने 2023 ते 2026 पर्यंत बीसीसीआयसोबत 358 कोटींचा करार केला होता. IPL आणि टीम इंडियाच्या स्पॉन्सरशिपसह ड्रीम 11 आणि My11Circle ने मिळून जवळपास 1000 कोटींचं योगदान दिलं आहे. पण ऑनलाइन गेमिंग बिल लागू झाल्यामुळे बीसीसीआयने हा करार संपवला आहे. आता बीसीसीआय ड्रीम 11 च्या जागी नवीन स्पॉन्सर शोधत आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, 28 ऑगस्टला बीसीसीआयच्या एपेक्स कौन्सिलची आपत्कालीन बैठक झाली. या बैठकीचं अध्यक्षस्थान कार्यकारी अध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी घेतलं होतं. या बैठकीत संभाव्य नव्या स्पॉन्सर्सवर चर्चा झाली, मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वी डील फाइनल करण्याइतका वेळ नाही असं ठरलं.
जपानी ऑटोमोबाईल कंपनी ‘Toyota’ आणि एक फिनटेक स्टार्ट-अप यांनी भारतीय टीमच्या जर्सी स्पॉन्सरशिपमध्ये रस दाखवला आहे, पण अजून अधिकृत प्रक्रिया सुरू झालेली नाही. बीसीसीआय ही गोष्ट मोठ्या दृष्टीने पाहत आहे. आशिया कपसाठी घाईघाईत छोटा करार करण्याऐवजी बोर्डला असं हवं आहे की 2027 वनडे वर्ल्ड कपपर्यंत टिकेल असा लॉन्ग टर्म डील व्हावी.
सध्या मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, आशिया कपदरम्यान टीम इंडिया स्पॉन्सर लोगोशिवायच्या जर्सीत मैदानात उतरू शकते. जर्सीवर फक्त देशाचं नाव लिहिलेलं असेल. आशिया कप 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईमध्ये खेळला जाणार आहे.
Comments are closed.