Asia Cup: बीसीसीआयचा मोठा निर्णय, यशस्वी जयस्वालसह 5 खेळाडू आशिया कपसाठी दुबईला जाणार नाहीत?
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने आशिया कप 2025 साठी निवडलेले पाच स्टँडबाय खेळाडू यशस्वी जयस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना मुख्य संघासोबत दुबईला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, कोणताही स्टँडबाय खेळाडू संघासोबत नेट बॉलर किंवा बॅकअप म्हणून प्रवास करणार नाही. गरज पडल्यास त्यांना थेट भारतातून बोलावले जाईल.
हा निर्णय संघ व्यवस्थापनाच्या त्या धोरणानुसार आहे की, स्पर्धेसाठी कमी खेळाडूंनीच प्रवास करावा. भारताने यावेळी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे, तर नियमांनुसार 17 खेळाडू घेण्याची मुभा होती.
सलामी फलंदाजीत आधीच शुबमन गिल (Shubman gill) , अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) उपलब्ध असल्याने जयस्वालला फक्त एखादा फलंदाज दुखापतग्रस्त झाल्यास बोलावले जाईल. त्याचप्रमाणे प्रसिद्ध कृष्णालाही (Prasiddh Krishna) वेगवान गोलंदाजीत दुखापत झाल्यास संधी मिळू शकते.
भारतीय संघ 4 सप्टेंबर रोजी दुबईला पोहोचेल आणि 5 सप्टेंबरपासून आयसीसी अकॅडमीमध्ये सराव सुरू करेल. यावेळी खेळाडू मुंबईत एकत्र न येता, थेट आपल्या-आपल्या शहरांतून दुबईला रवाना होतील.
भारत आपल्या स्पर्धेची सुरुवात पहिला सामना 10 सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध खेळून करेल. त्यानंतर 14 सप्टेंबरला पाकिस्तानशी आणि 19 सप्टेंबरला ओमानशी सामना होईल. त्यानंतर सुपर फोर फेरी सुरू होईल.
सध्या संघातील काही खेळाडू देशांतर्गत स्पर्धेत व्यस्त आहेत. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत उत्तर क्षेत्रासाठी खेळत आहेत, तर फिरकीपटू कुलदीप यादव मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे.
Comments are closed.