कोणत्या गोलंदाजाला षटकार मारायला जास्त आवडतं? रोहित शर्माचं भन्नाट उत्तर! म्हणाला…

रोहित शर्मा: भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या पॉवर-हिटर्सपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकाॅर्ड त्याच्या नावावर आहे, त्याने आतापर्यंत 637 षटकार ठोकले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये 93 आणि टी20 मध्ये 140 च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतो. अलीकडेच, एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा त्याला विचारण्यात आले की कोणत्या गोलंदाजाविरुद्ध षटकार मारायला त्याला सर्वात जास्त आवडते, तेव्हा त्याच्या उत्तराने संपूर्ण वातावरण टाळ्यांच्या गजराने आणि जयजयकाराने दुमदुमले. (Rohit Sharma Interview)

अलीकडेच एका कार्यक्रमात रोहित शर्माला विचारण्यात आले, “असा कोणता गोलंदाज आहे, ज्याला षटकार मारायला तुम्हाला जास्त आवडतं?” या प्रश्नावर रोहितने असे उत्तर दिले की संपूर्ण जमावाने जोरदार जयजयकार केला आणि टाळ्या वाजायला लागल्या. (Rohit Sharma Statement)

रोहित म्हणाला, “सर्वजणच आहेत यार. कोणत्याही गोलंदाजासमोर फलंदाजी करताना, त्याला मारायचेच, हाच विचार माझ्या मनात असतो. असा कोणी एकच नाही की त्यालाच मारायचे आहे.” (Rohit Sharma Statement)

रोहित पुढे म्हणाला, “माझा असाच विचार असतो. मी कोणा एकाबद्दल बोलू शकत नाही. पण माझ्या डोक्यात अशीच गोष्ट असते की, जो माझ्या समोर येईल, मला त्याच्याविरुद्ध चांगली कामगिरी करायची आहे आणि त्याला दबावाखाली आणायचे आहे. त्याला दबावाखाली आणण्याचे माझे स्वतःचे मार्ग आहेत आणि मी तोच प्रयत्न करतो.” (Rohit Sharma Statement)

रोहितने शेवटचा सामना मार्च 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी खेळला होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही जिंकले. सर्व काही ठीक राहिले तर, तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसू शकतो. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. (India vs Australia)

Comments are closed.