कोण आहे डॅनिश मालेवार? वयाच्या केवळ 21 व्या वर्षी शानदार फलंदाजी करत रचला इतिहास!

दुलीप ट्रॉफी 2025 (Dulip Trophy) मध्ये सेंट्रल झोनचा सामना नॉर्थ ईस्ट झोनशी होत आहे. सेंट्रल झोनकडून खेळणाऱ्या 21 वर्षांच्या डॅनिश मालेवरने (Danish Kalewar) आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डॅनिशने 222 चेंडूंचा सामना करत 203 धावांची धडाकेबाज खेळी केली. आपल्या या खेळीदरम्यान त्याने तब्बल 36 चौकार आणि एक षटकार ठोकला.

दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात विदर्भकडून द्विशतक झळकावणारा डॅनिश हा पहिला फलंदाज ठरला आहे. पदार्पणाच्या सामन्यातच दुहेरी शतक झळकावत त्याने इतिहास रचला. त्याचबरोबर डॅनिशने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पाही पार केला आहे.

फक्त 16 डावांमध्येच तो या टप्प्यावर पोहोचला. रणजी ट्रॉफीतही दानिशचे प्रदर्शन अप्रतिम राहिले होते. डॅनिशच्या दमदार खेळीच्या जोरावर सेंट्रल झोनच्या संघाने 532 धावांचा भक्कम डोंगर उभा केला.

Comments are closed.