भारत-पाकिस्तान सामना एकदा नाही, तर तीनदा होऊ शकतो? आशिया कप 2025 मध्ये रंगणार जबरदस्त थरार
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळला जाईल. भारतीय संघ (Indian cricket team) आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार असून त्यात त्यांचा सामना यूएईशी होईल. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील थरारक सामना देखील या आशिया कपमध्ये रंगणार आहे.
14 सप्टेंबरला हे दोन देश आमनेसामने भिडणार आहेत. मात्र, भारत-पाकिस्तान यांची फक्त एकदाच नाही तर तब्बल तीन वेळा भिडंत होण्याची शक्यता आहे. कारण, लीग सामन्यानंतर सुपर-4 मध्येही हे दोन संघ भिडू शकतात.
त्यानंतर जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर या स्पर्धेत भारत-पाकिस्तानची तिसऱ्या वेळेस देखील टक्कर होईल. आशिया कप 2023 मध्ये भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर मात करून किताब पटकावला होता. त्यामुळे यंदाच्या आशिया कपमध्येही (Asia Cup) भारत हाच मोठा दावेदार मानला जात आहे.
Comments are closed.