हरभजन सिंगने श्रीसंतला कानशिलात मारल्याचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर…! पहा संपूर्ण व्हिडिओ

हरभजनसिंग श्रीशांत फाईट व्हिडिओ: भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू, हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यातील वादाचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला आहे. इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हरभजन सिंग श्रीसंतला पाठीमागून कानशिलात मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयपीएलच्या पहिल्या हंगामातील, म्हणजेच 2008 चा आहे, जेव्हा मुंबई इंडियन्सकडून हरभजन सिंग आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून श्रीसंत आमने-सामने होते. (IPL 2008 slapgate controversy)

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी यांनी हरभजन सिंगने श्रीसंतला कानशिलात मारल्याचा व्हिडिओ उघड केला. (Lalit Modi reveals old IPL video) ललित मोदी म्हणाले की, “तो सामना संपला होता. सर्व कॅमेरे बंद झाले होते, पण माझा एक सुरक्षा कॅमेरा चालू होता. याच कॅमेऱ्यामध्ये श्रीसंत आणि भज्जी यांच्यातील वाद कैद झाला. भज्जीने श्रीसंतला पाठीमागून कानशिलात मारली, त्याच घटनेचा हा व्हिडिओ आहे.” या व्हिडिओमध्ये इरफान पठाण आणि महेला जयवर्धने भांडण सोडवताना दिसत आहेत.

भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने या घटनेबद्दल रविचंद्रन अश्विनला दिलेल्या मुलाखतीतही खुलासा केला होता. हरभजन म्हणाला होता की, “माझ्या आयुष्यात जर मला कोणती एक गोष्ट बदलायची असेल, तर ती श्रीसंतसोबत झालेला वाद आहे. मला ती घटना माझ्या आयुष्यातून काढून टाकायची आहे. जे घडले ते चुकीचे होते आणि मी तसे करायला नको होते. मी 200 वेळा माफी मागितली आहे. आजही मला त्या घटनेसाठी खूप वाईट वाटते. मला कुठेही आणि कधीही संधी मिळाली, तर मी त्याबद्दल माफी मागू शकतो, ती एक चूक होती.” (Harbhajan Singh interview Ashwin)

हरभजन सिंगने पुढे सांगितले की, एकदा अनेक वर्षांनंतर मी श्रीसंतच्या मुलीला भेटलो. मी तिच्यासोबत खूप प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती म्हणाली की तिला माझ्याशी बोलायचे नाही, कारण मी तिच्या वडिलांना मारले होते. हे ऐकून मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. मी स्वतःला विचारले की मी या लहान मुलीच्या मनावर असा कसा परिणाम केला? ती मला खूप वाईट माणूस मानत असेल. त्यानंतर मी तिच्या मुलीचीही माफी मागितली. (Harbhajan Singh apologizes to Sreesanth and his daughter)

Comments are closed.