6 चेंडूत हव्या होत्या 10 धावा, आशिया कपच्या 6 वेळच्या चॅम्पियन संघाने शेवटच्या 2 मिनिटांत फिरला

झिम्बाब्वे वि श्रीलंका, 1 ला एकदिवसीय: आशिया कपपूर्वी एक मोठा अपसेट होता होता टळला. श्रीलंकेने एका रोमांचक सामन्यात झिम्बाब्वेचा 7 धावांनी पराभव केला. या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 298 धावा केल्या, परंतु प्रत्युत्तर झिम्बाब्वे दबावाखाली दिसला आणि 7 धावांनी सामना गमावला. सिकंदर रजासारखा सेट फलंदाज असूनही, झिम्बाब्वेला हा सामना जिंकता आला नाही. खरं तर, शेवटच्या षटकात हॅटट्रिकने संपूर्ण सामना उलटला.

शेवटच्या षटकात 10 धावा हव्या होत्या

299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 49 षटकात 5 गडी गमावून 289 धावा केल्या. झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी फक्त 10 धावा हव्या होत्या. 10 धावा हे एक छोटे लक्ष्य वाटत होते, कारण सिकंदर रझा 92 धावा करून खेळत होता आणि दुसऱ्या टोकाला टोनी मुनयोंगा देखील 42 धावा करून सेट झाला होता. 2 सेट फलंदाजांसाठी 10 धावा ही मोठी गोष्ट नव्हती.

शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

शेवटच्या षटकात दिलशान मदुशंका गोलंदाजी करायला आला. त्याने 92 धावांवर पहिल्याच चेंडूवर सिकंदर रझाला आऊट केले. नवीन फलंदाज ब्रॅड इव्हान्स क्रीजवर आला, पण मदुशंका 0 धावांवर त्याला झेलबाद केले. मदुशंकाकडे हॅटट्रिकची संधी होती. नागरवा त्याच्यासमोर होता आणि मदुशंकाने टाकलेला गुड लेन्थ बॉल स्टंपच्या पुढे कधी गेला हे नागरवाला कळलेही नाही.

जिथे झिम्बाब्वेला 6 चेंडूत जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता होती, तिथे काही वेळातच 3 चेंडूत 10 धावांचे लक्ष्य झाले. मदुशंकाच्या हॅटट्रिकने अवघ्या 2-3 मिनिटांत सामना पूर्णपणे श्रीलंकेच्या बाजूने वळवला. 6 वेळा आशिया कप चॅम्पियन राहिलेल्या श्रीलंका संघाने सामना जिंकला.

हे ही वाचा –

Auqib Nabi Duleep Trophy Record : W,W,W,W… मैदानात घडला इतिहास, असा पराक्रम याआधी कधीच झाला नव्हता; जम्मू-काश्मीरच्या नवख्या गोलंदाजाचा कहर

साराच्या मागे उभी, आजीसासूचा वाढदिवस केला खास; लग्नाआधीच सूनबाई घरात, सचिन म्हणाला, तू खंबीर म्हणून…

आणखी वाचा

Comments are closed.