Video : LIVE सामन्यात तुफान राडा! भारताचे खेळाडू एकमेकांच्या अंगावर गेले धावून, अंपायरने मध्यस्

डीपीएल व्हिडिओ म्हणून नितीश राणा दिगवे रठी लढा: दिल्ली प्रीमियर लीग (DPL 2025) अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. काल दिल्ली प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना वेस्ट दिल्ली लायन्स आणि साऊथ दिल्ली सुपरस्टार्स (West Delhi Lions vs South Delhi Superstarz, Eliminator) या संघात रंगला होता. दोन्ही संघांसाठी हा सामना फारच महत्त्वाचा होता. पण सामन्यात एक वेगळंच घटना घडलं. वेस्ट दिल्लीचा नीतीश राणा (Nitish Rana) आणि साऊथ दिल्लीचा दिग्वेश राठी (Digvesh Rathi) हे भर मैदनात भिडले. पंच आणि खेळाडूंना मध्ये पडून प्रकरण शांत करावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

DPL 2025 मध्ये भिडले राणा अन् राठी, नेमकं काय घडलं?

वेस्ट दिल्ली लायन्सचा फलंदाज नीतीश राणा क्रीजवर होता आणि त्याच्या संघाला मोठं लक्ष्य गाठायचं होतं. तेवढ्यात साऊथ दिल्ली सुपरस्टार्सकडून दिग्वेश राठी गोलंदाजीला आला. राठीने एक चेंडू टाकायच्या आधीच थांबला आणि लगेच राणानेही त्याला पुढची चेंडू टाकायला रोखलं. इथूनच त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. पुढच्या चेंडूवर राणाने भन्नाट रिव्हर्स स्वीप मारत चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला आणि आपला बॅट किस करून सेलिब्रेशन केलं. यावरून राणा–राठी यांच्यात जोरदार वाद पेटला. शेवटी पंच आणि इतर खेळाडूंनी मध्ये पडून भांडण मिटवली.

एलिमिनेटरमध्ये राणाची तुफानी शतकी खेळी

हा सामना तसा जिंकणाऱ्या संघासाठी फार मोठा होता, कारण विजेत्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश मिळणार होता. साऊथ दिल्ली सुपरस्टार्सने आधी फलंदाजी करत 201 धावा केल्या. वेस्ट दिल्लीपुढं मोठं आव्हान होतं. क्रिष यादवने 31 धावा करून हातभार लावला, पण अंकित कुमार आणि आयुष दोसेजा मात्र अपयशी ठरले.

कर्णधार नीतीश राणावर जबाबदारी होती आणि अवघ्या 42 चेंडूत त्याने शतक ठोकलं. राणाने 55 चेंडूत नाबाद 134 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 243.64 होता. त्याने 15 गगनचुंबी षटकार आणि 8 चौकार ठोकले. त्याच्या या झंझावाती खेळीमुळे वेस्ट दिल्लीने केवळ 17.1 षटकांत लक्ष्य गाठत विजयी मार्च केला.

हे ही वाचा –

Harbhajan Singh Slapping Sreesanth Video : ‘वाटली पाहिजे मोदी अन्…’ कानाखाली मारण्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीसंतची पत्नी संतापली

आणखी वाचा

Comments are closed.