आशिया कपआधी पाकिस्तानचा ‘ब्लॉकबस्टर’ परफॉर्मन्स! कर्णधार सलमानचा कहर, राशिद खानची टीम चित

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान टी 20 सामना: आशिया कप 2025 आधी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात त्रिकोणी टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगला. ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा (Pakistan Captain Salman Agha) याने दमदार अर्धशतक झळकावले.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 गडी गमावून 182 धावांचा डोंगर उभा केला. त्याच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची टीम 19.5 षटकांत 143 धावांवर गारद झाली. पाकिस्तानसाठी लक्ष्याचा बचाव करताना हारिस रऊफने 4 विकेट्स घेतले.

पाकिस्तानकडून कर्णधार सलमान आगाने 36 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. आशिया कपच्या अगोदर सलमानचा हा तुफानी फॉर्म पाकिस्तानसाठी शुभसंकेत आहे, तर भारतासाठी एक मोठे आव्हान आहे. कारण आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून लीग, सुपर-4 आणि अंतिम सामना धरता दोन्ही संघांमध्ये तीन सामने होण्याची शक्यता आहे.

राशिद खानला सलग दोन षटकार

सलमानच्या धडाकेबाज फॉर्मची झलक त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार आणि जगातील सर्वात घातक फिरकीपटू मानल्या जाणाऱ्या राशिद खानला सलग दोन षटकार मारून दाखवली. कारण राशिद खानसारख्या गोलंदाजावर षटकार लगावणे सोपे मानले जात नाही. मात्र, पाकिस्तानकडून सलमानसोडून इतर कोणत्याही फलंदाजाने विशेष कामगिरी दाखवली नाही.

अफगाणिस्तानची गोलंदाजी सरासरीच

अफगाणिस्तानच्या गोलंदाजीत विशेष धार दिसून आली नाही. त्यांच्याकडून फरीद अहमदने सर्वाधिक 2 बळी घेतले, पण त्यासाठी त्याला 4 षटकांत तब्बल 47 धावा खर्च कराव्या लागल्या. याशिवाय मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी, अजमतुल्ला ओमरजई आणि राशिद खान यांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट जमा झाला.

हे ही वाचा –

Hasin Jahan Instagram Post : ‘जर मला वेड्या भटक्या भटक्या कुत्र्यांपासून घाबरायचं असतं, तर…’ मोहम्मद शमीच्या पत्नीची पोस्ट व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.