‘पती पत्नी और वो २’ च्या क्रू मेंबरवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, एफआयआर दाखल – Tezzbuzz
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अभिनेता आयुषमान खुराना (Ayushman Khurana) आणि सारा अली खान यांच्या आगामी ‘पती पत्नी और वो २’ या चित्रपटाच्या क्रू मेंबरवर काही स्थानिक रहिवाशांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे आणि मुख्य आरोपीला अटक केली आहे.
वृत्तानुसार अतिरिक्त पोलिस उपायुक्त (शहर) अभिजीत कुमार यांनी सांगितले की, २७ ऑगस्ट रोजी येथील थॉर्नहिल रोडवर ‘पती, पत्नी और वो २’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ही घटना घडली. बीआर चोप्रा फिल्म्सचे प्रोडक्शन हेड जोहेब सोलापूरवाला यांच्यावर काही स्थानिक रहिवाशांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.
बीआर चोप्रा फिल्म्सचे लाइन प्रोड्यूसर सौरभ तिवारी यांच्या तक्रारीवरून २८ ऑगस्ट रोजी सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्य आरोपी मेराज अलीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आयुष्मान खुराना स्टारर ‘पती पत्नी और वो २’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या प्रयागराजमध्ये सुरू आहे. अशा परिस्थितीत रेडिटवर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो एका स्थानिक व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक चित्रपट कर्मचाऱ्यांना मारहाण करत आहेत. ‘पती पत्नी और वो २’ हा चित्रपट २०१९ च्या हिट चित्रपट ‘पती पत्नी और वो’ चा सिक्वेल आहे. मूळ चित्रपटात भूमी पेडणेकर, अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट मुदस्सर अझीझ यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यातील गाणीही खूप गाजली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘डू यू वॉना पार्टनर’चा ट्रेलर रिलीज; आगामी वेब सिरीज मध्ये दिसणार तमन्ना भाटीया आणि डायना पेंटी…
Comments are closed.