‘त्यांची उणीव नेहमी भासेल…’ बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB चे मोठे पाऊल, पीडितांच्या कु

चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरणपत्रिका अद्ययावत बातम्या: 4 जून 2025 रोजी आयपीएल स्पर्धेतील पहिल्या जेतेपदानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयी जल्लोषादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या तीन महिन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मोठा निर्णय घेतला आहे. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या चाहत्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25-25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबाबत आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले.

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB चे मोठे पाऊल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट केली आणि लिहिले की, “4 जून 2025 हा आमच्यासाठी दु:खद दिवस होता. आम्ही आमच्या आरसीबी परिवारातील अकरा सदस्य गमावले. ते आमच्या संघाचा, शहराचा आणि समुदायाचा अविभाज्य भाग होते. त्यांची उणीव नेहमी भासेल.”

आरसीबीने पुढे म्हटले की, “त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघू शकत नाही. परंतु पहिल्या टप्प्यात आणि मन:पूर्वक आदराच्या भावनेतून आरसीबीने त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत दिली आहे. ही केवळ आर्थिक मदत नसून करुणा, एकता आणि सातत्याने पाठिंबा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

संघाने पुढे लिहिले की, “याचबरोबर ‘आरसीबी केअर्स’चीही सुरुवात होत आहे. ही दीर्घकालीन उपक्रमाची सुरुवात असून, त्यांच्या स्मृतींना सन्मान देऊन खऱ्या अर्थाने काम करण्याची वचनबद्धता आहे. पुढचा प्रत्येक पाऊल चाहत्यांच्या भावना, अपेक्षा आणि त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करेल.”

आरसीबी व्यवस्थापनाने सांगितले की,  आरसीबी केअर्स विषयी अधिक माहिती लवकरच दिली जाईल. याआधी 28 ऑगस्ट रोजी आरसीबीने एक पोस्ट शेअर केली होती, जी 4 जूनच्या घटनेनंतरची त्यांची पहिली सोशल मीडिया पोस्ट होती. त्यात ‘आरसीबी केअर्स’ची घोषणा करण्यात आली होती.

दुर्दैवी घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर…

लक्षात घेण्यासारखे म्हणजे, आरसीबीने आयपीएल 2025 चे विजेतेपद पंजाब किंग्सला पराभूत करून पटकावले होते. तब्बल 18 वर्षांनंतर आरसीबीला पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद मिळाले होते. या ऐतिहासिक विजयानंतर चाहत्यांनी 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने जल्लोष साजरा केला. स्टेडियमच्या बाहेरही प्रचंड गर्दी झाली. अचानक परिस्थिती हाताबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 33 जण जखमी झाले होते.

हे ही वाचा –

AFG vs PAK 1st T20 : आशिया कपआधी पाकिस्तानचा ‘ब्लॉकबस्टर’ परफॉर्मन्स! कर्णधार सलमानचा कहर, राशिद खानची टीम चित, टीम इंडिया धास्तावली

आणखी वाचा

Comments are closed.