आणीबाणीच्या उपचारापूर्वी पैशाची मागणी केल्याबद्दल तुरुंगवास
रुग्णालये-डॉक्टरांसाठी नवीन नियम : राज्य सरकारकडून अधिकृत आदेश जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
रुंग्णालये आणि डॉक्टरांसाठी राज्य सरकार नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. यापुढे सरकारी आणि खाजगी ऊग्णालयांमधील डॉक्टरांनी उपचारापूर्वी अपघातग्रस्तांकडून पैसे मागितले तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. राज्य सरकारने शुक्रवारी या संदर्भात एक परिपत्रक जारी केले. त्यामुळे राज्यातील डॉक्टरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गुरुंवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि सरकारने शुक्रवारी अधिकृतपणे त्यानुसार आदेश जारी केला आहे.
राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी रुंग्णालयांनी अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार द्यावेत. जखमींना उपचार देण्यात विलंब करू नये. एखाद्यावेळेस आगाऊ पैसे मागत उपचारांना विलंब झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा होईल, असा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक खासगी वैद्यकीय संस्था कायदा, 2007 च्या तरतुदींनुसार, यामध्ये केवळ रस्ते अपघात प्रकरणेच नाही तर अपघाती किंवा जाळपोळ, विषबाधा आणि गुन्हेगारी हल्ल्याच्या प्रकरणांचाही समावेश आहे.
जखमी रुग्ण उपचारासाठी ऊग्णालयात दाखल होताच त्यांच्यावर आगाऊ पैसे न मागता उपचार केले पाहिजेत. एखाद्यावेळेस उपचार देण्यास विलंब झाल्यास किंवा आपत्कालीन उपचार न मिळाल्यास किंवा उपचारापूर्वी पैसे मागितल्यास संबंधितांना कर्नाटक खासगी वैद्यकीय संस्था कायदा, 2007 च्या कलम 2 नुसार एक लाख ऊपयांपर्यंत दंड आणि तुऊंगवास निश्चित करण्यात आला आहे.
Comments are closed.