52 वर्षीय महिलेची क्रूर हत्या, तिला एक जादूटोणा
सोनभद्रा:
उत्तरप्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. तेथे एका महिलेला चेटकिण ठरवत ठार करण्यात आले आहे. तर महिलेच्या पतीवरही धारदार अस्त्राने हल्ला करत त्याला गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना परसोई गावात घडली आहे. मृत महिला 52 वर्षांची होती तिचे नाव राजवंती असे होते. तिचा पती 57 वर्षीय बाबूलाल खरवार गंभीर जखमी झाला आहे. दोघेही घरात असताना गावातील गुलाब नावाचा इसम स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत तेथे आला, त्याने दांपत्यावर जादूटोण्याचा आरोप करत धारदार अस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात राजवंतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बाबूलाल गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळत जखमी बाबूलाला यांना रुग्णालयात दाखल केले. बाबूलाल यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Comments are closed.