पंजाबचे मुख्यमंत्र्यांचे आरोग्य बिघडले आहे

भगवंत मान यांना रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था/ मोहाली

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती अधिकच खालावल्यानंतर शुक्रवारी त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. प्रकृतीत कोणतीही लक्षणीय सुधारणा दिसून येत नसल्याने डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर आता शुक्रवारी रात्री त्यांना फोर्टिसमध्ये नेण्यात आले. अरविंद केजरीवाल गुरुवारी मुख्यमंत्री मान यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले होते.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या उपस्थितीत शुक्रवारी चंदीगडमध्ये पंजाब मंत्रिमंडळाची बैठक घेणार होती. मात्र मुख्यमंत्री आजारी पडल्यानंतर ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीत पुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेल्या राज्यात सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यांवर लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा होती. तत्पूर्वी ते आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सुलतानपूर लोधीला भेट देणार होते. या भागातील अनेक गावे पुरामुळे बाधित आहेत. परंतु प्रकृती बिघडल्यामुळे ते पूरग्रस्त भागाचा दौराही करू शकले नाहीत.

Comments are closed.