भारतीय सेल्फीजचे सर्वाधिक बळी आहेत
सोशल मीडियाच्या युगात परफेक्ट सेल्फी कधीकधी जीवघेणी ठरू शकते. अनेकदा धोकादायक सेल्फी घेण्याच्या नादात लोकांचा मृत्यूही होतो. याप्रकरणी भारत सर्वात पुढे असल्याचे एका अध्ययनात दिसून आले आहे.
द बार्बर लॉ फर्मकडून करण्यात आलेल्या नव्या अध्ययनात कुठल्या देशात सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणे सर्वात धोकादायक आहे हे समोर आले आहे. फर्मच्या संशोधकांनी मार्च 2014 ते मे 2025 पर्यंत जगभरात सेल्फीशी निगडित घटनांचे अध्ययन केले. यात वृत्त अहवालांचा वापर करत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात थेट ईजा किंवा मृत्यू झालेल्या प्रकरणांना सामील करण्यात आले.
या अध्ययनात भारत सेल्फीप्रकरणी जगातील सर्वात धोकादायक देश ठरला आहे. जगभरात सेल्फी घेण्याच्या नादात झालेल्या 42.1 टक्के दुर्घटना भारतात घडल्या आहेत. भारतात 2014 पासून आतापर्यंत सेल्फीमुळे 271 दुर्घटना घडल्या असून यात 214 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 57 प्रकरणांमध्ये लोक जखमी झाले आहेत.
अमेरिका दुसऱ्या स्थानी
याप्रकरणी अमेरिका दुसऱ्या स्थानावर राहिला असून येथे सेल्फी घेण्याच्यात जीवितहानी फारच कमी राहिली आहे. अमेरिकेत धोकादायक सेल्फीची एकूण 45 प्रकरणे नोंद आहेत. यातील 37 प्रकरणांमध्ये लोकांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. अशाप्रकारे 19 बळींसह रशिया तिसऱ्या क्रमांकावर राहिला. येथे सेल्फीच्या नादात 18 लोकांचा मृत्यू झाला आणि 1 जखमी झाला होता.
अमेरिका आणि रशियात झालेल्या घटना भारताच्या तुलनेत कमी आहेत. तरीही त्या एक चिंताजनक पॅटर्न समोर आणतात. विशेष स्वरुपात पर्यटकांनी भरलेल्या ठिकाणी लोक धोकादायक क्षणांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रवृत्त होतात. या यादीत पाकिस्तान चौथ्या स्थानावर राहिला, येथे सेल्फी घेण्याच्या नादात 16 बळी गेले. ऑस्ट्रेलियात 13 लोकांचा सेल्फी घेताना मृत्यू झाला तर केवळ दोन जण जखमी झाले.
या घटनांमुळे जातो जीव
संशोधकांनी घनदाट लोकसंख्या असलेली क्षेत्रे, जोखिमयुक्त स्थळापर्यंत पोहोचणे म्हणजेच पर्वत आणि रेल्वेमार्ग, मजबूत सोशल मीडिया संस्कृतीला यासाठी जबाबदार घटक ठरविले आहे.
खाली पडून होतात मृत्यू
अध्ययनानुसार जगभरात सेल्फीशी निगडित मृत्यूचे सर्वात सामान्य कारण पडणे आहे, जे एकूण दुर्घटनेच्या 46 टक्के आहे. छतावरून, पर्वतावरून किंवा उंच इमारतींवरून पडून सर्वाधिक दुर्घटना घडतात आणि अनेकदा सर्वाधिक जीवघेण्या असतात.
प्रसिद्धीपायी धोका पत्करणे
आमचे संशोधन एक चिंताजनक प्रवृत्ती समोर आणत आहे. जेथे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याची इच्छा लोकांचा जीव घेत आहे. एका चांगल्या छायाचित्रासाठी हा धोका पत्करणे अजिबात योग्य नसल्याचे द बार्बर लॉ फर्मचे संस्थापक क्रिस बार्बर यांनी म्हटले आहे.
व्हायरल कंटेट
इन्स्टाग्राम आणि टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्म्सच्या निरंतर लोकप्रियतेसोबत आश्चर्यकारक, साहसी सेल्फी घेण्याच्या दबाव पूर्वीपेक्षा तीव्र झाला आहे. व्हायरल कंटेंट तयार करण्याची इच्छा अनेकदा मूलभुत सुरक्षेकडे दुर्लक्ष करविते. यामुळे लोक अनावश्यक आणि कधीकधी घातक जोखीम पत्करतात.
सेल्फी घेण्यासाठी 10 सर्वात धोकादायक देश
देश प्रकरणे
भारत 271
अमेरिका 45
रशिया 19
पाकिस्तान 16
ऑस्ट्रेलिया 15
इंडोनेशिया 14
केनिया 13
इंग्लंड 13
स्पेन 13
ब्राझील 13
Comments are closed.