ब्रीट्झकेची सलग पाच अर्धशतकांची जादू, दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडवर वन डेतील पहिला महिला मालिका विजय

इंग्लंड संघाच्या वन डे फॉर्ममध्ये सततची अस्वस्थता सुरू असताना, 26 वर्षीय मॅथ्यू ब्रीट्झकेने इतिहास रचून दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडमध्ये पहिलावहिला एकदिवसीय मालिका विजय मिळवून दिला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.

आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच असामान्य कामगिरी करणाऱया ब्रीट्झकेने हॅमस्ट्रिंग दुखापतीनंतरच्या पहिल्याच सामन्यात 85 धावा करून संघाला 330 धावांपर्यंत पोहोचवले. नंतरच्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी संघर्षपूर्ण सामन्यात अवघ्या पाच धावांनी थरारक विजयाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेने आठ बाद 330 धावा केल्या होत्या तर इंग्लंडचा संघ 9 बाद 325 धावांपर्यंतच पोहोचू शकला. आपल्या कारकिर्दीत पदार्पणापासून स्वप्नवत कामगिरी करणाऱया ब्रीट्झकेने आज आणखी एक वेगवान खेळी केली आणि सलग पाच अर्धशतकांचा अद्वितीय विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्या पाच डावांमध्ये फलंदाजी करताना 50 पेक्षा अधिक धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. या कामगिरीमुळे त्याने पाच एकदिवसीय सामन्यांत 150, 83,57,88 आणि 85 अशा खेळ्या करत 92.60 धावांच्या सरासरीने 463 धावा केल्या आहेत.

Comments are closed.