मुंबईत दहशत माजवण्याचा कट! धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडामध्ये अटक

अनंत चतुर्दशीच्या ऐन मोक्यावर शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा संदेश आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. या धमकीमुळे मुंबई पोलिस हाय अलर्टवर होते. दरम्यान आता हा धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अश्विनी असे त्या आरोपीचे नाव असून त्याला नोएडा येथून अटक करण्यात आली आहे.

सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. १४ लष्कर-ए-जिहादी दहशतवादी मुंबईत घुसले आहेत आणि ४०० किलो आरडीएक्स वापरून ३४ वाहनांमध्ये स्फोट घडवण्याचा कट रचण्यात आला आहे,असे आरोपीने सांगितले. सध्या, आरोपीला नोएडा पोलिसांनी अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आरोपी अश्विनीला गुरुवारी नोएडा सेक्टर-११३ येथून अटक करण्यात आली. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवलेल्या मेसेजमुळे पोलिसांना त्याची माहिती मिळाली आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोन देखील जप्त केला आहे.

मुंबई पोलीस अलर्ट मोडवर-

मुंबई पोलिसांनी शहर आणि राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. या धमकीचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून अधिक तपास केला जात आहे. तसेच आरोपीची चौकशी केली जात आहे.विशेष म्हणजे गणेश चतुर्दशीच्या वेळी हा धमकीचा संदेश आला होता, जेव्हा मुंबईत लाखो लोक उत्सवात सहभागी होत होते. आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे, त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा आणखी वाढवली आहे.

मुंबईवर आत्मघाती हल्ल्याची धमकी, 34 वाहनांमध्ये 34 मानवी बॉम्ब… 400 किलो; आरडीएक्स पेरल्याचा दावा, पोलिसांकडून कसून तपास

Comments are closed.