जळगावच्या बाबुजी पुरामध्ये 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत शेजाऱ्याच्या घरात

जलगाव गुन्हा: जळगाव जिल्ह्याच्या यावल (Yawal) शहरातील बाबूजी पुरा भागात राहणाऱ्या माजी खान जनाब यांचा सहा वर्षीय मुलगा हनन खान काल (दि. 5 सप्टेंबर) सायंकाळपासून बेपत्ता होता. बालकाचा मृतदेह आज सकाळी शेजारी राहणाऱ्या घरात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस (Police) बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)

हत्या की अपघात? नागरिकांत संतापाची लाट

मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यामुळे, हननच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर संशय घेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली. संशयित आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी करत जमाव आक्रमक झाला. या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली असून, संपूर्ण बाबूजी पुरा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस यंत्रणा अलर्ट, एक संशयित ताब्यात

या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. बालकाच्या मृत्यूचे कारण उघड होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

पोलीस प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : मी एसपी, आयजी, डीजीला घाबरत नाही, पालकमंत्री माझ्या खिशात, पीआयकडून महिलेवर अत्याचार; अखेर ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन

Vanraj Andekar Case: ‘टपका रे टपका, एक ओर टपका’, संकेत की योगायोग? डीजेवर गाणं लावून आयुषला संपवलं? टोळीयुध्द पुन्हा भडकण्याची शक्यता

आणखी वाचा

Comments are closed.