‘म्हणूनच तोडावा लागला करार…’ ड्रीम 11 वर बीसीसीआयचं मोठं विधान समोर आलं
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आणि ड्रीम 11 यांच्यातील करार संपुष्टात आला आहे. बीसीसीआयने ड्रीम 11 सोबतचा कॉन्ट्रॅक्ट 6 महिने आधीच संपवला. कारण म्हणजे ऑनलाईन गेमिंग सुधारणा 2025 नंतर ड्रीम 11 ला मोठा धक्का बसला. सरकारने ड्रीम 11सह अनेक एप्सना पैशांची देवाणघेवाण करण्यास मनाई केली. त्यानंतर ड्रीम 11 ला मोठे नुकसान सहन करावे लागले. आता बीसीसीआयनेही ड्रीम 11बाबत मोठे वक्तव्य करत डील रद्द होण्यामागची करणे स्पष्ट केली आहेत.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ड्रीम 11 विषयी बोलताना सांगितले की, आमचा ड्रीम 11 सोबत तीन वर्षांचा करार होता. मात्र नवीन कायद्यामुळे आम्हाला अचानक हा करार संपवावा लागला. ते आता बीसीसीआयच्या प्रायोजकतेचा भाग राहिलेले नाहीत. आमच्याकडे त्यांच्या सोबत अजून सहा महिने बाकी होते, पण आता आम्ही अडीच ते तीन वर्षांसाठी नव्या कराराचा विचार करत आहोत.
बीसीसीआयने बायजुच्या जागी 2023 मध्ये ड्रीम 11 सोबत 3 वर्षांचा करार केला होता, जो मार्च 2026 पर्यंत चालणार होता. पण ही डील ऑगस्ट 2025 मध्येच रद्द झाले.
ड्रीम 11 नंतर बीसीसीआय आता नवीन जर्सी प्रायोजकत्वाच्या शोधात आहे. यासाठी बोर्डाने टेंडरही जाहीर केले असून, त्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. बीसीसीआय यापूर्वी एका द्विपक्षीय सामन्यासाठी जर्सी प्रायोजक कंपनीकडून 3.17 कोटी रुपये आकारत होती. मात्र आता बोर्डाने एका सामन्यासाठी 3.50 कोटी रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आयसीसी आणि एसीसी स्पर्धांसाठी बीसीसीआय यापूर्वी प्रति सामना 1.12 कोटी रुपये आकारत होती, पण आता बोर्डाने तो दर 1.50 कोटी रुपये करण्याची घोषणा केली आहे. लक्षात घ्या की दारू, तंबाखू, सट्टेबाजी, रिअल मनी गेम, क्रिप्टोकरन्सी आणि पॉर्नोग्राफीशी संबंधित ब्रँड्स या निविदेत सहभागी होऊ शकणार नाहीत. अशा कंपन्या थेट स्पर्धेबाहेर राहणार आहेत.
Comments are closed.