सोन्याच्या दरानं ग्राहकांना दिला झटका, 22 कॅरेट सोनं एका लाखांवर, तर 24 कॅरेट सोन्याचा दर काय?

सोन्याच्या किंमतीच्या बातम्या: देशातील सोन्याच्या किंमतीत (Gold Price) दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज (शनिवार 6 सप्टेंबर) सोन्याच्या किंमती सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 1 लाख 08  हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळं हा ग्राहकांना मोठा फटका आहे.

देशात पुन्हा एकदा सोन्याच्या दरानं ग्राहकांना झटका दिला आहे. किंमतीत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1 लाख रुपये झाला आहे. त्याच वेळी, 24 कॅरेटची किंमत 1 लाख 08 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे.

सोने आणि चांदीवरील जीएसटीमध्ये कोणताही बदल नाही

सरकारने सोने आणि चांदीवरील 3 टक्के जीएसटीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामुळे, आता गुंतवणूकदारांचे लक्ष सप्टेंबरमध्ये होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे आहे. यामध्ये व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे. येथे, अमेरिकन टॅरिफबद्दल जागतिक अनिश्चिततेमध्ये, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी पुन्हा एकदा वाढत आहे.

आज 10 ग्रॅम सोन्याला किती दर?

आज 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 10 हजार 849 रुपयांना विकले जात आहे, जे कालच्या 10 हजार 762 रुपयांच्या किमतीपेक्षा 87 रुपये जास्त आहे. हे भारतातील सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे संकेत आहे. त्याच वेळी 8 ग्रॅम सोन्याची किंमत 696 रुपयांनी वाढून 86 हजार 792 रुपये झाली आहे. तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत कालच्या तुलनेत 870 रुपयांनी वाढून 1 लाख 08 हजार 490 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे 100 ग्रॅम सोन्याची किंमत 10 लाख 84 हजार 900 रुपयांवर गेली आहे, जी कालच्या 10 लाख 76 हजार 200 रुपयांच्या किमतीपेक्षा 8 हजार 700 रुपये जास्त आहे.

भारतात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ

आज, 6 सप्टेंबर 2025 रोजी, भारतात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. आज 22 कॅरेट सोने सर्वाधिक किमतीला विकले जात आहे. एक ग्रॅम सोन्याची किंमत आता 9945 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, 8 ग्रॅम सोन्याची किंमत 640रुपयांनी वाढून 79560 रुपये झाली आहे, तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 98650 रुपयांवरून 800रुपयांनी वाढून 99450 रुपये झाली आहे. घाऊक खरेदीदारांसाठी 100ग्रॅम सोन्याची किंमत 994500 रुपये आहे, जी कालच्या 986500 रुपयांपेक्षा 8000 रुपये जास्त आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

सोन्याच्या दरानं रचला नवीन विक्रम! दरात 2 हजार 100 रुपयांची वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी द्यावी लागते एवढी रक्कम

आणखी वाचा

Comments are closed.