आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हिंदी कॉमेन्ट्री पॅनेल जाहीर, सेहवाग-इरफानसह ‘या’ दिग्गजांचा समावेश!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) चा पहिला सामना 9 सप्टेंबरला होणार आहे, तर फायनल सामना 28 सप्टेंबरला होईल. भारताने आशिया कप 2023 जिंकला होता. आता पुन्हा टीम इंडियाला हा खिताब जिंकण्याची महत्वाकांक्षा असेल. या स्पर्धेसाठी हिंदी कॉमेन्ट्री पॅनेल जाहीर करण्यात आले आहे. या यादीत अनेक भारतीय दिग्गजांना संधी दिली आहे. वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) आणि इरफान पठानसह (Irfan Pathan) अनेक स्टार्स हिंदी कॉमेन्ट्री पॅनेलचा भाग बनले आहेत. आशिया कप 2025शी संबंधित महत्वाच्या अपडेट्सवर नजर टाकूया.
आशिया कपसाठी हिंदी कॉमेन्ट्री पॅनेलमध्ये वीरेंद्र सहवाग, इरफान पठान, अजय जडेजा, विवेक राजदान, अभिषेक नायर, सबा करीम, गौरव कपूर, आतिश ठुकराल आणि समीर कोचर यांचा समावेश आहे. हे स्टार्स आशिया कप 2025 मध्ये हिंदीत कॉमेन्ट्री करतील.
आशिया कप 2025 (Asia Cup) चे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. टीव्हीवर लाईव्ह प्रसारण सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 वर पाहता येईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी सर्व सामने सोनी लिव्ह अॅपवर पाहता येतील. भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील. आधी हे सामने संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार होते, पण UAE मधील उष्णतेमुळे सामना अर्धा तास उशिरा सुरू होईल.
Comments are closed.