गंगा नदीचे अस्तित्व धोक्यात आहे
गंगा नदीचा प्रमुख स्रोत गंगोत्री ग्लेशियर मागील 40 वर्षांमध्ये 10 टक्के वितळला आहे. याचे कारण हवामान बदल आहे. आयआयटी इंदोर आणि आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांच्या एका नव्या अध्ययनातून हा बदल समोर आला आहे. ग्लेशियरच्या प्रवाहात बर्फाच्या वितळण्याचे योगदान कमी होत असून पाऊस आणि भूजल प्रवाह वाढत असल्याचे अध्ययनात आढळून आले आहे. हा बदल उत्तर भारताच्या जलसंपदेसाठी गंभीर आव्हाने निर्माण करू शकतो.
आयआयटी इंदोरच्या ग्लेशी-हायड्रो क्लायमेट लॅबच्या डॉक्टोरल स्कॉलर पारुल विंजे यांच्या नेतृत्वात हे अध्ययन जर्नल ऑफ द इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेंसिंगमध्ये प्रकाशित झाले आहे. यात अमेरिकेतील 4 विद्यापीठे आणि नेपाळच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंटच्या वैज्ञानिकांनी साथ दिली. अध्ययनात उपग्रह आणि वास्तविक आकडेवारीचा (91980-2020) वापर करत मॉडेलिंगद्वारे गंगोत्री ग्लेशियर सिस्टीम (जीजीएस)चे विश्लेषण करण्यात आले.
गंगोत्रीच्या प्रवाहात बदल
बर्फाचे वितळण्याचे कमी होणारे योगदान : मागील 40 वर्षांमध्ये गंगोत्रीच्या एकूण प्रवाहात बर्फाच्या वितळण्याचा हिस्सा 64 टक्के राहिला, जो ग्लेशियरचा मुख्य स्रोत आहे. यानंतर ग्लेशियर वितळणे (21 टक्के), पावसामुळे प्रवाह (11 टक्के) आणि भूजलाचे (4 टक्के) योगदान आहे. परंतु बर्फाच्या वितळण्याचा हिस्सा 1980-90 मधील 73 टक्क्यांवरून कमी होत 2010-20 मध्ये 63 टक्के झाला आहे.
2010-20 मध्ये सुधार : 2000-10 मध्ये बर्फ वितळण्याचा हिस्सा 52 टक्क्यांपर्यंत कमी झाला होता, परंतु 2010-20 मध्ये हे प्रमाण वाढून 63 टक्के झाले. यादरम्यान हिवाळ्यातील तापमान 2 अंशांनी कमी झाले. हिवाळ्यात पाऊस 262 मिमिने वाढला, यामुळे बर्फाचे प्रमाण वाढले आणि उन्हाळ्यात तो वितळून गंगेचा प्रवाह वाढल्याचे संशोधकांनी सांगितले.
तापमानात वृद्धी : 2001-20 दरम्यान गंगोत्री क्षेत्राचे सरासरी तापमान 1980-2000 च्या तुलनेत 0.5 अंशाने वाढले. यामुळे उन्हाळ्यात बर्फ लवकर वितळण्यास सुरुवात होते. पीक डिस्चार्ज ऑगस्टपासून जुलैत शिफ्ट झाला आहे.
अन्य अध्ययनांचा निष्कर्ष
अन्य संशोधनही या अध्ययनाची पुष्टी करतात. हिमालयीन ग्लेशियर दरवर्षी सरासरी 46 मीटर रुंदी गमावत अताहेत. गंगोत्रीचे तीन दशकांपर्यंत अध्ययन केले असून याचा स्नाउट सातत्याने मागे सरकत असल्याचे वक्तव्य पश्चिम बंगाल प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि नदीतज्ञ कल्याण रुद्र यांनी सांगितले. मे महिन्यात द क्रायोस्फीयर नियतकालिकात प्रकाशित अन्य संशोधनात गंगोत्रीत हवामान बदलाच्या प्रभावाला मांडले गेले होते. यात 2017-23 दरम्यान ग्लेशियरच्या जलत आयतनमध्ये घट दर्शविण्यात आली.
हवामान बदलाचा प्रभाव
अध्ययनात हवामान बदलामुळे गंगोत्री क्षेत्रात कमी हिमवृष्टी होत आहे, कारण तापमान वाढल्याने कमी प्रमाणात बर्फ निर्माण होत आहे, याच्या परिणामादाखल..
बर्फ वितळण्यात घट : हिमक्षेत्र आणि बर्फ वितळल्याने होणाऱ्या प्रवाहात घट दिसून आली. तर पाऊसाचा प्रवाह आणि भूजल प्रवाह वाढला आहे.
पीक डिस्चार्जमध्ये बदल : 1990 च्या दशकापासून पीक डिस्चार्ज जुलैत होऊ लागला आहे, जो पूर्वी ऑगस्टमध्ये व्हायचा. हे जलविद्युत उत्पादन, सिंचन आणि उंच ठिकाणांमध्ये जलसुरक्षेसाठी आव्हान आहे.
आकडेवारी : 2001-2010 मध्ये उच्चतम दशकीय तापमानासोबत (3.4 अंश) कमाल दशकीय डिस्चार्ज (28.9 क्यूबिक मीटर प्रति सेकंद) नोंद करण्यात आला. 1991-2000 ते 2001-2010 पर्यंत सरासरी डिस्चार्जमध्ये 7.8 टक्क्यांची वृद्धी झाली.
Comments are closed.