हक्कदार असूनही संघाबाहेर बसणे निराशाजनक; श्रेयस अय्यरची खंत

हिंदुस्थानचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघातून वगळल्यानंतर त्याने सोमवारी आपली प्रतिक्रिया दिली. मी संघातील हक्कदार खेळाडू असूनही आज संघाबाहेर बसलोय. हे माझ्यासाठी अतिशय निराशाजनक आहे, अशी मनातील खदखद त्याने बोलून दाखवली. मात्र आपण टीम इंडियातील पुनरागमनासाठी कठोर मेहनत करत असल्याचेही त्याने सांगितले. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघात अय्यरचा समावेश झाला नाही. त्याऐवजी या महिन्याअखेरीस ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यांत तो हिंदुस्थान ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, ‘खऱया अर्थाने निराशा तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला माहिती असते की, तुम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविण्याच्या पात्रतेचे आहात. परंतु त्याच वेळी एखादा खेळाडू संघासाठी सतत चांगले प्रदर्शन करत असेल तर त्याला मिळणारे समर्थनही योग्यच ठरते.
Comments are closed.