कुलगममध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले
‘ऑपरेशन गुट्टर’मध्ये जेसीओसह दोघे जखमी
सर्कल संस्था/ श्रीनगर
काश्मीरच्या कुलगाममध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. सोमवारी सकाळी गु•रच्या जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. लष्कराने याला ‘ऑपरेशन गु•र’ असे नाव दिले आहे. यादरम्यान एका जेसीओसह 2 सैनिक जखमी झाले आहेत.
ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो शोपियानचा रहिवासी आहे. तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता आणि सप्टेंबर 2023 पासून सक्रिय होता. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा संस्थांनी जाहीर केलेल्या 14 दहशतवाद्यांच्या यादीतही त्याचा समावेश होता.
गुप्तचर विभागाकडून जंगलात लष्कर-ए-तोयबाचे तीनहून अधिक दहशतवादी लपल्याची माहिती देण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, लष्कराच्या 9आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांच्या लपण्याची माहिती मिळाल्यानंतर, पथक गु•रच्या जंगलात एका संशयास्पद ठिकाणी पोहोचले. जिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. या कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्यानंतर चकमक तीव्र झाली. या संघर्षात दोघांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. या चकमकीनंतर अतिरिक्त सुरक्षा दलांना या भागात पाठवण्यात आले आहे.
ऑगस्टमध्ये दोन मोठ्या कारवाया
यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. त्यापैकी एकाची ओळख बागू खान म्हणून झाली, ज्याला ‘ह्यूमन जीपीएस’ असे म्हटले जात होते. 1995 पासून तो 100 हून अधिक घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असल्याने सुरक्षा दल अनेक दशकांपासून त्याचा शोध घेत होते. त्याला घुसखोरीचे सर्व मार्ग माहित असल्यामुळे त्याला ‘ह्यूमन जीपीएस’ असे नाव देण्यात आले होते. त्यापूर्वी 1 ते 12 ऑगस्ट दरम्यान, श्रीनगरपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या कुलगाममध्ये ‘ऑपरेशन अखल’ राबविण्यात आले होते. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी मारला गेला. त्याची ओळख पुलवामाचा रहिवासी हरिस दार म्हणून झाली होती.
Comments are closed.