सोने प्रतितोळा 1 लाख 8 हजारपार

सोने आणि चांदीने आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाने नांगी टाकल्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. 24 कॅरेट शुद्ध सोने आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सोन्याच्या किमती विविध शहरांत वेगवेगळ्या असल्या तरी सोने प्रतितोळा 1 लाख 8 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे, तर चांदीच्या दरातसुद्धा मोठी वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांत चांदीचा भाव प्रतिकिलो 1 लाख 24 हजार 320 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीची मागणी वाढल्याने किमती वाढत आहेत. सोन्याच्या खरेदीनंतर मेकिंग चार्ज आणि जीएसटी लागू होते.

शहर 22 कॅरेट 24 कॅरेट

  • दिल्ली 98,779 1,07,750
  • मुंबई 98,945 1,07,940
  • कोलकाता 98,816 1,07,800
  • चेन्नई 99,229 1,08,250
  • बंगळुरू 99,018 1,08,020
  • हैदराबाद 99,100 1,08,110
  • अहमदाबाद 99,100 1,08,080
  • पुणे 98,945 1,07945
  • जयपूर 98,926 1,07920
  • लखनऊ 98,973 1,07,970

Comments are closed.