स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी VVPAT वापरले जाणार नाही, काँग्रेसने केलेली मागणी राज्य निवडणूक आयोगाकडून अमान्य

राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी VVPAT वापरले जाणार नाहीत असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहे. या निवडणुकांसाठी VVPAT मशीन्स वापरले जावे अशी मागणी काँग्रेसने केली होती, पण राज्य निवडणूक आयोगाने ही मागणी अमान्य केली आहे. तसेच या निवडणुकांसाठी किती ईव्हीएण आणि मतदान केंद्र लागतील याचा आकडा राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबत वृत्त दिले आहे. या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाला 1.5 लाख बॅलेट युनिट्स (BU) आणि 80,000 हून अधिक कंट्रोल युनिट्स (CU) लागतील. हीच दोन्ही यंत्रे मिळून एक ईव्हीएम तयार होते. यासाठी राज्य निवडणूक आयोग जवळपास 80 हजार मतदान केंद्रे उभारणार आहे.

मध्यप्रदेश राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राला सुमारे 1 लाख बॅलेट्स युनिट आणि 25 हजार हून अधिक कंट्रोल युनिट्स उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. याशिवाय, केंद्रीय निवडणूक आयोग राज्याला 25 हजार बॅलेट्स युनिटआणि 15 हजार कंट्रोल युनिट्स देणार आहे. उरलेली बॅलेट्स युनिट आणि कंट्रोल युनिट्सची आवश्यकता आपल्या राज्यात उपलब्ध आहे आणि ती निवडणुकांत वापरली जाणार आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कडून मिळणारी बॅलेट्स युनिट आणि कंट्रोल युनिट्स केवळ मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहेत.

काँग्रेसने या निवडणुकीत निवडणुकांमध्ये मतदान पडताळणीसाठी VVPAT मशीन्स वापरल्या जाव्यात अशी मागणी केली होती. पण या निवडणुकांमध्ये VVPAT मशीन्स वापरल्या जाणार नाहीत असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदान व मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी राज्य निवडणूक आयोग
सर्व पावले उचलेल, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले. तसेच, यंदाच्या १ जुलै रोजी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने तयार केलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयोग स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोग अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याच्या स्थितीत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था प्रभाग रचनेचे काम पूर्ण करत आहेत. त्यांनी ते नियोजित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर मतदार यादीनुसार प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन योग्य पद्धतीने केले जाईल. हे काम पूर्ण झाल्यावरच आम्ही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याच्या स्थितीत येऊ, असेही वाघमारे म्हणाले.

VVPAT मशीन्स
VVPAT म्हणजे Voter-verified paper audit trail. मतदानावेळी जेव्हा मतदार ज्या उमेदवाराला मतदान करतो तेव्हा एक स्लीप दिसते. ज्या उमेदवाराला मतदान केलं असतं त्याची पावती मतदाराला दिसते आणि आपण हव्या त्याच उमेदवाराला मतदान केले आहे त्याची खातरजमा मतदाराला होते.

Comments are closed.