नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरुच; राष्ट्रपती, कायदे मंत्र्यांच्या निवासस्थानी जाळपोळ, पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

नेपाळमध्ये हिंसक चळवळ सुरुच असून काठमांडूच्या रस्त्यावर हजारो आंदोलक जाळपोळ, दगडफेक करत सुटले आहे. सामाजिक मीडियावरील बंदी उठवल्यानंतरही तरुणांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. त्यामुळे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन दुबईला जाण्याची शक्यता आहे.
नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर ‘जेन झी’ पिढी रस्त्यावर उतरली. ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक सुरू झाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 20 जण ठार झाले, तर 400 हून अधिक जखमी झाले. तरुणांच्या उग्र आंदोलनाचा धसका बसलेल्या सरकारने देशभरात संचारबंदी लागू केली. राजधानी काठमांडूमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री कॅबिनेटची बैठक पार पडली आणि सोशल मीडियावरील बंदी उठवण्यात आली. या निर्णयानंतरही काठमांडूतील निदर्शने थांबली नाहीत.
नेपाळ निषेध | नेपाळ पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आज संध्याकाळी सर्व-पक्षीय बैठकीची मागणी केली.
“परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि अर्थपूर्ण निष्कर्ष शोधण्यासाठी मी संबंधित पक्षांशी संवाद साधत आहे. त्यासाठी मी आज संध्याकाळी at वाजता सर्व-पक्षीय बैठक देखील बोललो आहे. मी नम्रपणे सर्वांना विनंती करतो… pic.twitter.com/uddmh1iybl
– वर्षे (@अनी) 9 सप्टेंबर, 2025
Comments are closed.