Asia Cup 2025 : संजू सॅमसन प्लेइंग 11 मध्ये नसणार? जाणून घ्या कर्णधार सूर्यकुमार काय म्हणाला?
आशिया कप 2025 (Asia Cup) स्पर्धेमध्ये टीम इंडिया (IND vs UAE) पहिला सामना यूएईविरुद्ध खेळणार आहे. पण सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, प्लेइंग 11 मध्ये संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळणार का? कारण, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्याने केरळ क्रिकेट लीग 2025 (KCL) मध्ये जोरदार फलंदाजी केली होती.
सलामी फलंदाज म्हणून त्याचा फॉर्म आणि स्ट्राईक रेट दोन्ही जबरदस्त दिसून आले. यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संजूच्या प्लेइंग इलेव्हनमधील जागेबाबत विचारले असता तो म्हणाला, आम्ही संजूची चांगली काळजी घेत आहोत. काळजी करू नका. उद्याच्या सामन्यापूर्वी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.
आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर करताना निवड समितीने स्पष्ट केले होते की, अभिषेक शर्मासोबत (Abhishek Sharma) डावाची सुरुवात शुबमन गिल (Shubman gill) करणार आहे. गिलचे टी20 संघात पुनरागमन झाले असून त्याला उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. यानंतरपासूनच चर्चेला उधाण आले की, सॅमसनला अंतिम 11 मध्ये खेळवले जाईल का? आणि जर खेळवले तर कोणत्या फलंदाजीच्या क्रमांकावर?
संजू सॅमसन सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. केरळ क्रिकेट लीग 2025 मध्ये त्याच्या बॅटने धडाकेबाज खेळी केली. 6 सामन्यांत या यष्टिरक्षक-फलंदाजाने 73 च्या सरासरीने आणि 186 च्या स्ट्राईक रेटने एकूण 368 धावा केल्या.
विशेष म्हणजे या 6 सामन्यांत त्याने तब्बल 30 षटकार आणि 24 चौकार ठोकले. त्यामुळेच त्याच्या अलीकडच्या फॉर्मकडे पाहता, त्याला प्लेइंग 11 च्या बाहेर ठेवणे टीम मॅनेजमेंटसाठी खूप कठीण ठरणार आहे.
Comments are closed.