जनसुरक्षा कायद्याविरोधात महाराष्ट्रात उद्या राज्यव्यापी आंदोलन, शिवसेनाही होणार सहभागी

जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जनविरोधी, घटनाविरोधी आणि लोकशाही हक्कांचे हनन करणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत तालुका आणि जिल्हा पातळीवर भव्य निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षही सहभागी होणार आहे.

या आंदोलनाचा मुख्य कार्यक्रम बुधवार, दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, दादर (पश्चिम) येथे होणार आहे. या निदर्शनांद्वारे जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात जनतेचा रोष व्यक्त केला जाणार आहे. संघर्ष समितीने सर्व नागरिकांना या आंदोलनात सहभागी होऊन लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.