देवाभाऊ सोलापूरच्या घटनेवरून अजितदादांवर नाराज, अंजना कृष्णा प्रकरणाचा मागवला अहवाल

सोलापूरमध्ये अवैध उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दम भरला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून टीका होताच अजितदादांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, सोलापूरच्या घटनेवरून देवाभाऊ अजितदादांवर कमालीचे नाराज झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे.

सोलापूरमध्ये करमाळय़ाच्या महिला आयपीएस अधिकारी डीवायएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडीओ कॉलवर जोरदार वाद झाला होता. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना अजित पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, जी काही कायदेशीर करायची आहे ती झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा अहवाल मागवला असून तो आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे त्यांनी सांगितले.

Comments are closed.