पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, आम्ही इथले भाई म्हणत दोन भावांवर कोयत्याने हल्ला, दहशत पसरवू नका म
गुन्हे ठेवा:पुण्यातील औंध परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. आम्ही इथले भाई आहोत, दुकान बंद करा, अशा शब्दांत धमकावत दोन भावांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. यासोबतच मोबाईल शॉपीच्या बाहेरची काच फोडून दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं. एवढंच नाही तर या दहशतीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका व्यक्तीची सफारी गाडी फोडून त्याला लक्ष्य करण्यात आलं. या तिन्ही घटनांमुळे औंध परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे. (Crime News)
हल्ल्याच्या सलग घटना
औंधमधील एका व्यापाऱ्याला आणि त्याच्या भावाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. “दुकान बंद कर नाहीतर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी देत हल्लेखोरांनी परिसरात गोंधळ उडवला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एका मोबाईल शॉपीच्या बाहेरील काच फोडली. याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. दुसऱ्या घटनेत, “ही दहशत पसरवू नका” असं सांगणाऱ्या स्थानिक व्यक्तीची सफारी गाडी हल्लेखोरांनी फोडली. या गाडीचे फोटोही समोर आले असून त्यावरून गुन्ह्याची गंभीरता स्पष्ट होते.
पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
औंधसारख्या व्यस्त आणि नागरी भागात कोयता गैंग इतक्या बेधडकपणे दहशत निर्माण करत असेल, तर पोलिस प्रशासन काय करतंय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. स्थानिकांनी पोलिसांना तातडीने या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करूनच या दहशतीवर नियंत्रण मिळवता येईल, असं नागरिकांचं म्हणणं आहे. औंध परिसरातील सलग घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेलाच नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेलाही मोठं आव्हान निर्माण करत आहेत. दुकाने फोडणे, वाहने उद्ध्वस्त करणे आणि नागरिकांवर कोयत्याने हल्ले करणे या प्रकारांमुळे भीतीचं वातावरण वाढलं आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवणं गरजेचं आहे.
एकतर्फी प्रेमातून शेजारच्या तरुणीवर सपासप वार
शेजारी राहणाऱ्या तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून एकतर्फी प्रेम करणाऱ्या 24 वर्षीय शेजाऱ्यानं तिची हत्या केली. 23 वर्षीय तरुणीची भाजी कापण्याच्या सुऱ्याने तिच्या राहत्या घरातच 10 महिन्यापूर्वी गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यामधील खळबळजनक बाब म्हणजे मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीलाही सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केले होते. ही घटना भिवंडी शहरातील भादवड गावातील कानिफनाथ मंदिराजवळील कृष्णानगरमधील शत्रुघ्न तरे चाळीत घडली होती.
आणखी वाचा
Comments are closed.