खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नीचे निधन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील (51) यांचे बुधवारी मुंबईतील जसलोक रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

गेल्या वर्षभरापासून त्या आजारी होत्या. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर विविध तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार सुरू होते. मात्र त्यांचे आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.11 सप्टेंबर रोजी आष्टी येथे सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा कृष्णा पाटील, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

सुषमा पाटील आष्टीकर या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार स्व. बापुरावजी पाटील आष्टीकर यांच्या मोठ्या सुनबाई होत्या. 1991 मध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सोबत त्यांचा विवाह झाला होता. त्या अत्यंत शांत, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. अनेक धार्मिक कार्यक्रमध्ये त्यांचा सहभाग असायचा? किडनीच्या आजारामुळे त्यांना दिनांक 22 जुलै रोजी मुंबई येथील जसलोक रुग्णालयात दाखल केले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत अतिशय खालावली होती. दिनांक १० सप्टेंबर रोजी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.

Comments are closed.