DIY Hair Bun: जुन्या ब्रा पॅडचा भन्नाट वापर, बनवा स्टायलिश हेअर बन घरच्या घरी

सण-समारंभ म्हटलं की नव्या कपड्यांसोबत सुंदर दागिने आणि आकर्षक हेअरस्टाईल ही प्रत्येक मुलीची खास इच्छा असते. पण प्रत्येक वेळी पार्लरला जाऊन महागडी हेअरस्टाईल करून घेणं शक्य होत नाही. अशावेळी घरच्या घरी केलेले काही DIY हेअरस्टाईल हॅक्स खूप उपयोगी ठरतात. अशाच एका हटके उपायाबद्दल आपण जाणून घेऊ जुन्या ब्रा पॅडपासून बनवलेला हेअर बन. (diy hair bun from old bra pad)

जुन्या ब्रा पॅडचा क्रिएटिव्ह वापर

बहुतेक वेळा जुनी ब्रा फेकून दिली जाते. पण त्यातील पॅड वापरून तुम्ही अगदी परफेक्ट हेअर बन बनवू शकता. हा बन दिसायला आकर्षक तर असतोच, पण केस व्यवस्थित गुंडाळून घट्ट ठेवतो. त्यामुळे केस मोकळे होण्याचा त्रास होत नाही.

हा हेअर बन ट्रॅडिशनल नऊवारी साडी, सलवार-कुर्ती किंवा अगदी मॉडर्न ड्रेससोबतही सुंदर दिसतो. गजरा, कृत्रिम फुले किंवा मोत्यांच्या पिन्स लावून तुम्ही त्याला आणखी स्टायलिश लूक देऊ शकता.

हा हेअर बन कसा तयार करायचा?

1. सर्वप्रथम जुन्या ब्रा मधील पॅड काढा.

2. त्याला गोलाकार आकारात नीट कापा.

3. आता या पॅडवर ग्लू गनच्या मदतीने मोत्यांची लेस किंवा सजावटीच्या गोष्टी चिकटवा.

4. आतल्या बाजूस केसांची जाळी लावा.

5. केसांना गोलाकार पद्धतीने गुंडाळून या पॅडने तयार केलेला बन कव्हर लावा.

इतक्या सोप्या पद्धतीने तयार केलेला हा बन तुमचा लूक पूर्णपणे बदलून टाकेल.

फायदे:

केस व्यवस्थित गुंडाळले जातात आणि बन घट्ट राहतो.

पार्लरला जाण्याचा खर्च वाचतो.

टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून स्टायलिश लूक मिळतो.

प्रत्येक कपड्याच्या लूकला शोभून दिसतो.

जुन्या ब्रा पॅडचा हा टाकाऊपासून टिकाऊ वापर तुम्हाला केवळ क्रिएटिव्हच नाही तर आर्थिकदृष्ट्याही फायद्याचा ठरतो. त्यामुळे यंदाच्या सणासुदीला पार्लरच्या खर्चात बचत करून हा हटके DIY हेअर बन नक्की करून पाहा आणि तुमच्या लूकला नवा टच द्या.

Comments are closed.