Asia Cup: टी20 क्रिकेटमध्ये कोहली-रोहित आणि धोनीपेक्षा यशस्वी ठरला कर्णधार सूर्यकुमार! चकित करणारी आकडेवारी समोर

दुबईत यूएईविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त विजय मिळवला (IND vs UAE). या सामन्यात भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन उच्च दर्जाचे पाहायला मिळाले. गोलंदाजीत कुलदीप यादव (Kuldeep yadav & Shivam Dube) आणि शिवम दुबे यांनी कमाल दाखवली, तर फलंदाजीत अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) जोरदार खेळी करत संघाला भक्कम पाया दिला.

यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवचे नेतृत्व खूपच उठून दिसले. योग्य वेळी केलेले गोलंदाजी बदल आणि स्वतःला फलंदाजी क्रमात वर पाठवण्याचा घेतलेला निर्णय संघासाठी अगदी परफेक्ट ठरला. आकडेवारी सांगते की सूर्यकुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि धोनी यांच्यापेक्षा जास्त यशस्वी कर्णधार म्हणून नाव कमावले आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडियाची धुरा सूर्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने या फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. किमान 10 टी-20 सामने कर्णधार म्हणून नेलेल्या खेळाडूंमध्ये सूर्या सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताचा विजय टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच 82.6 टक्के आहे. या बाबतीत त्याने रोहित शर्मालाही मागे टाकले आहे (रोहितचा विजय टक्का – 80.6). या यादीत कोहली तिसऱ्या आणि हार्दिक पांड्या चौथ्या स्थानावर आहेत.

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारताने आजवर 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी 19 सामने जिंकले असून फक्त 4 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर टी-20 मालिका जिंकली होती. त्याचबरोबर इंग्लंडलाही भारतात पराभवाचा धक्का दिला होता. आशिया कपमध्ये सूर्यकुमार प्रथमच कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करत आहे.

Comments are closed.