Sindhudurg Crime News – निर्दयी मुलाचा जन्मदात्या आईवर कोयत्याने हल्ला; मातेचा जागीच मृत्यू, कणकवली तालुका हादरला

दारूच्या नशेत भान हरवून बसलेल्या एका निर्दयी मुलाने जन्मदाच्या आईच्या डोक्यात कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्या मातेचा जागीच मृत्यू झाला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना कणकवली तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे तालुका हादरून गेला आहे. याप्रकरणी आरोपी रवींद्र रामचंद्र सोरफ (45) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या घटनेमुळे समाजमन सुन्न झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली तालुक्यातील वारगाव सोरफ-सुतारवाडी येथे बुधवारी (10 सप्टेंबर 2025) रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री आई प्रभावती रामचंद्र सोरफ (80) आणि मुलगा रवींद्र यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या रवींद्रने कोयत्याने आईच्या डोक्यावर आणि शरीरावर वार केले. या हल्ल्यात प्रभावती या रक्तबंबाळ झाल्या होत्या. या घटनेमुळे सोरफ कुटुंबीय हादरून गेलं आहे. या घटनेमची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दाखल होईपर्यंत प्रभावती यांचा जागीच मृत्यू झाला होता. या खून प्रकरणी आरोपी मुलगा रवींद्र सोरफ याला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.