Asia Cup: कपिल देव यांचं भारत -पाक सामन्याविषयी मोठं वक्तव्य! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil dev) यांनी सांगितलं की, टीम इंडिया (Asia Cup 2025 Team India) सध्या उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे. यूएईविरुद्धची विजय मिळवलेली कामगिरी जबरदस्त होती. त्यांना विश्वास आहे की, आशिया कप जिंकून भारतीय संघ परत येईल. (Kapil Dev Prediction on Asia Cup 2025)
माध्यमांशी बोलताना कपिल देव म्हणाले, भारतीय संघाने छान खेळ केला आणि जबरदस्त विजय मिळवला. मला खात्री आहे की टीम आशिया कपमध्ये चॅम्पियन ठरेल.
भारत-पाक सामन्याबाबत कपिल देव म्हणाले,
रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं (Kapil Dev on India vs Pakistan Asia Cup 2025) की खेळाडूंचं काम फक्त खेळणं आहे. त्यांना काही बोलायची गरज नाही. ते खेळण्यासाठी गेले आहेत. जिंकून परत यावं. बाकी जे काही बोलायचं किंवा करायचं ते सरकार त्यांच्या स्तरावर करत आहे.
भारत-पाकिस्तान (Ind vs Pak Asia Cup Schedule) यांच्यात रविवारी आशिया कप 2025 मधील लीग सामना होणार आहे. त्यानंतर 21 सप्टेंबरलाही आणि अंतिम फेरीतही दोन्ही संघ पुन्हा एकमेकांशी भिडू शकतात. भारत-पाकिस्तान सामन्याबाबत देशात विरोधाचे सूर उमटत आहेत. अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी या सामन्याला विरोध दर्शवला आहे.
संघटनांचं म्हणणं आहे की, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध लोक मारले गेले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला, ज्यात अनेक सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं. या घटनेनंतर भारत सरकारने स्पष्ट सांगितलं होतं की पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत. मग सामना का खेळला जात आहे? पाकिस्तानसोबतचा सामना हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या भावना आणि विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांप्रती तसेच त्यानंतरच्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानाच्या विरोधात आहे.
मनोज तिवारीसह (manoj tiwari) अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 दरम्यान भारताच्या दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. आशिया कप सुरू होण्यापूर्वीच भारत सरकारने स्पष्ट केलं होतं की, पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका होणार नाही, फक्त ICC आणि ACC स्पर्धांमध्येच भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळतील.
Comments are closed.