आई सोडून गेली, काकाने सांभाळ केला, आज तोच पठ्ठ्या जगातील सर्वात श्रीमंत बनला, मस्कलाही पछाडलं
लॅरी एलिसन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती: जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल झाला आहे. ओरेकलचे (Oracle) 81 वर्षीय सह-संस्थापक लॅरी एलिसन (Larry Ellison) यांनी इलॉन मस्कला (Elon Musk) मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index) लॅरी एलिसन यांची नेटवर्थ 393 बिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 34.60 लाख कोटी रुपये आहे, जी इलॉन मस्कच्या 385 बिलियन डॉलर्स (385 Billion Dollars) म्हणजेच सुमारे 33.90 लाख कोटी रुपयांच्या नेटवर्थपेक्षा जास्त आहे.
ओरेकलचे शेअर वाढ (Oracle Earnings & Stock Surge)
या ऐतिहासिक बदलाचे कारण मंगळवारी संध्याकाळी ओरेकल (Oracle) च्या शेअर्समध्ये झालेली मोठी वाढ आहे. 10 सप्टेंबर रोजी अमेरिकन शेअर बाजार उघडताच, कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 41% वाढ झाली, ज्यामुळे लॅरी एलिसन (Larry Ellison) यांच्या जवळ कंपनीचे 116 कोटी शेअर्स असल्यामुळे शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीचा थेट परिणाम त्यांच्या नेटवर्थवर झाला आणि एका दिवसातच त्याची संपत्ती तब्बल 9 लाख कोटी रुपयांनी वाढली. विशेष म्हणजे, याच वर्षी जून महिन्यात लॅरी एलिसन यांनी जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना मागे टाकत ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.
लॅरी एलिसन कोण आहेत? (Who is Larry Ellison?)
लॅरी एलिसन यांचा जन्म 1944 मध्ये न्यूयॉर्क शहरात एका अविवाहित ज्यू महिलेच्या घरी झाला. त्यांची आई फ्लॉरेन्स स्पेलमन (Florence Spellman) या ज्यू महिलेच्या घरी त्यांचा जन्म झाला. केवळ नऊ महिन्यांचे असताना लॅरी एलिसनला निमोनिया झाला आणि त्यानंतर त्याच्या आईने त्याला त्यांच्या काका-काकू लिलियन (Lillian) आणि लुई (Louis Ellison) यांच्याकडे दिले. लॅरी एलिसन यांच बालपण शिकागो येथे गेले. बाराव्या वर्षी जेव्हा त्यांना हे समजले की त्याला दत्तक घेतले गेले आहे, तेव्हा ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात मोठा धक्का होती. याचा त्यांच्या विचारसरणीवर आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर खोल परिणाम झाला. वयाच्या 48 व्या वर्षापर्यंत लॅरी एलिसन यांनी आपल्या आईचा चेहरा पाहिला नाही.
ओरॅकलची स्थापना
1977 मध्ये लॅरी एलिसन (Larry Ellison) यांनी डेटाबेस सॉफ्टवेअर (Database Software) कंपनी म्हणून ओरेकलची स्थापना केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर ही कंपनी एका जागतिक क्लाउड कंप्यूटिंग पॉवरहाऊस मध्ये रूपांतरित झाली. आज 80 वर्षांचे लॅरी एलिसन हे ओरेकल कॉर्पोरेशनचे चेअरमन (Chairman) आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.