‘क्रिकेटचा देव’ होणार BCCI चा पुढचा अध्यक्ष? सचिन तेंडुलकरच्या वक्तव्यामुळे सर्वकाही झाले स्पष्

बीसीसीआयच्या अध्यक्षांवर सचिन तेंडुलकर: बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी 70 वर्षांची वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयच्या कायद्यानुसार कोणताही अधिकारी 70 वर्षांनंतर पदावर राहू शकत नाही. बिन्नी यांनी पद सोडल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र आता सचिनच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

SRT स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे निवेदन

सचिन रमेश तेंडुलकर (SRT) स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सचिन तेंडुलकर यांना बीसीसीआय अध्यक्षपदासाठी विचारात घेतले जात आहे किंवा नामनिर्देशन झाले आहे, अशा काही निराधार बातम्या पसरवल्या जात आहेत. यामध्ये कोणताही तथ्यांश नाही. कृपया अशा अफवांकडे लक्ष देऊ नये.”

28 सप्टेंबरला बीसीसीआयमध्ये निवडणूक

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये नवे बीसीसीआय अध्यक्ष आणि आयपीएलचे अध्यक्ष यांची निवड होण्याची शक्यता आहे. आयपीएल अध्यक्ष अरुण कुमार धूमल यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना ‘कूलिंग ऑफ पिरियड’ला जावे लागेल. दरम्यान, विद्यमान सचिव देवजीत सैकिया, संयुक्त सचिव रोहन गौंस देसाई आणि कोषाध्यक्ष प्रभतेजसिंग भाटी हे आपल्या पदांवर कायम राहतील, अशी अपेक्षा आहे. राजीव शुक्ला सध्या उपाध्यक्ष असून तेही कोणत्या ना कोणत्या भूमिकेत बीसीसीआयशी जोडलेले राहतील, अशी चर्चा आहे.

‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर यांची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये होते. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान त्यांच्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा पराक्रम करणारे ते एकमेव खेळाडू आहेत. कसोटीत त्यांनी 15,921 धावा तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 18,426 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा –

Pakistan Cricketer Retirement : पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा ट्रेंड सुरूच; आशिया कपदरम्यान अचानक पाकच्या खेळाडूने घेतली निवृत्ती, सर्व झाले चकित

आणखी वाचा

Comments are closed.