Asia Cup: संघ व्यवस्थापन ‘या’ फलंदाजासाठी संजूवर अन्याय करत आहे, कृष्णमाचारी श्रीकांत यांचा मोठा आरोप!
आशिया कप (Asia Cup 2025) मध्ये बुधवारी भारत विरुद्ध संयुक्त अरब अमीरात (IND vs UAE) सामना सुरू होण्याआधीच संजू सॅमसनच्या (Sanju Samson) चाहत्यांकडून शेकडो प्रश्न विचारले जात होते. पण व्यवस्थापनाने त्याला संघात संधी देऊन त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, आता माजी मुख्य निवडकर्ता आणि कर्णधार कृष्णाचारी श्रीकांत (Krushnachari Shrikant) यांनी संजू संदर्भात अप्रत्यक्षपणे भारतीय व्यवस्थापनावर मोठा आरोप केला आहे. श्रीकांत यांच्या मते संजूच्या फलंदाजीच्या क्रमामध्ये एक “साजिश” दिसत आहे.
श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले,माझ्या मते, भारतीय व्यवस्थापन संजू सॅमसनला क्रमांक-5 वर खेळवून श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) पुनरागमनासाठी मार्ग मोकळा करत आहे. संजूने या क्रमांकावर फार कमी फलंदाजी केली आहे आणि त्याला इथे खेळायला लावू नये. मी त्याच्यासाठी आनंदी नाही. उलट मी त्याला चेतावणी देईन की हा त्याची शेवटची संधी असू शकते.
माजी ओपनर पुढे म्हणाले, जर पुढच्या दोन-तीन डावांमध्ये तो या क्रमांकावर अपयशी ठरला, तर मग अय्यर त्याची जागा घेईल. व्यवस्थापन त्याला मिडल ऑर्डरमध्ये खेळवत आहे. प्रश्न असा की ते त्याला फिनिशर म्हणून वापरत आहेत का? नाही, कारण ही जबाबदारी हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्याकडे आहे. मग संजू नंबर-5 वर खेळेल, पण तो या स्थानावर कितपत चांगली कामगिरी करू शकेल? हाच मोठा प्रश्न आहे. आपण जितेश शर्मापूर्वी संजूला संघात घेतले आहे, हे आशिया कपसाठी योग्य आहे. पण पुढचा प्रश्न असा की टी20 विश्वचषकात मग काय होईल?
Comments are closed.