शारीरिक संबंधांनंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

निकोप शारीरिक संबंध हे फक्त आनंद देण्यासाठीच नसतात, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरतात. लैंगिक संबंधानंतर महिलांच्या शरीरात काही हार्मोन्स वेगाने स्रवतात, जे शरीर-मन शांत ठेवण्यापासून ते नातं अधिक घट्ट करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी राठोड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (hormonal changes in women after sex)

सेक्सनंतर महिलांच्या शरीरात होणारे महत्त्वाचे हार्मोनल बदल

1. ऑक्सिटोसिन – ‘लव्ह हार्मोन’

सेक्सनंतर अवघ्या काही मिनिटांतच ऑक्सिटोसिन हार्मोन मोठ्या प्रमाणात तयार होतो. याला ‘लव्ह हार्मोन’ किंवा ‘कडल हार्मोन’ही म्हणतात. या हार्मोनमुळे पार्टनर्समध्ये भावनिक जवळीक वाढते, विश्वास वाढतो आणि नातं अधिक मजबूत होतं.

2. डोपामिन – आनंद देणारं हार्मोन

सेक्सनंतर महिलांच्या शरीरात डोपामिनचं प्रमाण वाढतं. हा हार्मोन आनंद, समाधान आणि उत्साहाची भावना निर्माण करतो. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि मन प्रसन्न राहतं.

3. एंडोर्फिन – नैसर्गिक वैदिक

एंडोर्फिन हार्मोन्स सेक्सदरम्यान मोठ्या प्रमाणात स्रवतात. हे शरीराचे ‘नॅचरल पेनकिलर’ मानले जातात. त्यामुळे शरीरातील वेदना कमी होतात, मूड सुधारतो आणि महिलांना रिलॅक्स वाटतं.

4. प्रोलॅक्टिन – विश्रांती आणि शांततेसाठी

हा हार्मोन सेक्सनंतर झोप आणि मानसिक शांततेसाठी महत्त्वाचा ठरतो. महिलांना रिलॅक्सेशन आणि समाधानाची भावना मिळते. प्रोलॅक्टिन हार्मोन गर्भधारणेनंतर दूध तयार होण्याच्या प्रक्रियेतही आवश्यक असतो.

शारीरिक संबंधांचे इतर आरोग्यदायी फायदे:

– ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिनमुळे शांत झोप येते.

– नियमित शारीरिक संबंधांमुळे इम्यून सिस्टम मजबूत राहते.

– मानसिक तणाव कमी होतो, मन प्रसन्न राहतं.

– नात्यातील जवळीक आणि विश्वास अधिक घट्ट होतो.

– हार्मोनल संतुलनामुळे त्वचा, केस आणि मूडवर चांगला परिणाम होतो.

– रक्तदाब नियंत्रित राहतो, ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.

शारीरिक संबंध हे केवळ शारीरिक सुखापुरते मर्यादित नसून, त्यानंतर होणारे हार्मोनल बदल महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. योग्य आणि निकोप नातं टिकवण्यासाठीही हे बदल महत्त्वाचे असतात. त्यामुळे सेक्सनंतर होणाऱ्या या नैसर्गिक प्रक्रियांबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे.

Comments are closed.