काय..! खरचं? हार्दिक पांड्याचे घड्याळ 20 कोटी रुपयांचे? जाणून घ्या खरी किंमत

आशिया कपमध्ये हार्दिक पांड्या केवळ त्याच्या हेअरस्टाईलमुळेच नव्हे तर त्याच्या महागड्या घड्याळामुळेही प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. सराव सत्रातून काढलेल्या त्याच्या छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या छायाचित्रांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत, ज्यामुळे लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की हार्दिक खरोखरच 20 कोटी रुपयांचे घड्याळ घालून खेळत आहे का ?

हार्दिक पांड्याच्या मनगटावर बांधलेले घड्याळ हे लक्झरी घड्याळे बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रिचर्ड मिल कंपनीचे घड्याळ आहे. हार्दिकने घातलेले घड्याळ ‘रिचर्ड मिल आरएम 27-04’ मॉडेलचे आहे, ज्याची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे. हे आशिया कप 2025 च्या बक्षीस रकमेपेक्षा 8 पट जास्त आहे. जगात असे फक्त 50 घड्याळे आहेत, ज्यामुळे ते एक अतिशय मौल्यवान आणि खास वस्तू बनते.

हार्दिक पांड्या त्याच्या लक्झरी घड्याळामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी तो ‘रिचर्ड मिल आरएम 27-02’ परिधान करताना दिसला, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.

हार्दिक पांड्याच्या निशाण्यावर आशिया कपचे अनेक विक्रम आहेत. तो या स्पर्धेत टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड देखील ठरू शकतो. हार्दिक त्याच्या टी-20 कारकिर्दीत 2000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 188 धावा दूर आहे. त्याच वेळी, हार्दिकच्या टी-20 कारकिर्दीत 94विकेट्स आहेत आणि तो 6 फलंदाजांना बाद करताच तो 100 विकेट्स क्लबमध्ये सामील होईल.

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचा पुढील सामना 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी खेळला जाणार आहे. हार्दिकला पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यांमध्ये गोलंदाजी करायला विशेष आवडते. त्याने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 7 टी-20 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.