मला ते अद्यापही कळलेलं नाही…; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी शाहीद अफ्रिदीचं वादग्रस्त विधान

शाहिद आफ्रिदी इंड. आशिया चषक स्पर्धेची सुरुवात झाली असून भारताचा पहिला सामना यूएईविरुद्ध झाला. या सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्सने युएईचा पराभव केला. आता भारताचा पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहीद अफ्रिदीने (Shahid Afridi) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

शाहीद अफ्रिदी सामा चॅनलवर बोलताना म्हणाला की, मी नेहमीच क्रिकेट सुरूच राहावे असे म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील (भारत आणि पाकिस्तान) संबंध सुधारण्यास नेहमीच मदत झाली आहे. इंग्लंडमधील लोकांनी WCL सामने पाहण्यासाठी तिकिटे खरेदी केली होती आणि खेळाडूंनीही सराव केला होता. पण त्यानंतर तुम्ही सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. नेमका काय विचार होता, हे मला अद्याप कळलेलं नाहीय, असं शाहीद अफ्रिदी म्हणाला.

युवराज सिंग आणि शिखर धवनवर टीका-

आशिया कपमधील सामन्यापूर्वी युवराज सिंग आणि शिखर धवनवर टीका करून शाहिद अफ्रिदीने भारताला चिथावणी दिली आहे. हे लोक जन्मापासूनच स्वतःला भारतीय म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं वादग्रस्त विधान शाहीद अफ्रिदीने केलं. तसेच शिखन धवनचं नाव न घेता त्याला वाईट व्यक्ती म्हणूनही संबोधले आहे.

भारतीय संघाने WCL सामन्यावर टाकला होता बहिष्कार-

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL 2025) च्या उपांत्य फेरीत इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्सचा (Pakistan Champions vs India Champions) आज सामना रंगणार होता. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानसोबत उपांत्य फेरीचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. इंडिया चॅम्पियन्सच्या संघाने अधिकृतपणे स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे पाकिस्तानला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. शिखर धवन, हरभजन सिंग, इरफान पठाण आणि सुरेश रैना यासारख्या काही माजी भारतीय खेळाडूंनी या सामन्यातून आपली नावे मागे घेतली होती, त्यानंतर आयोजकांना भारत आणि पाकिस्तानचा सामना रद्द करावा लागला.

आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक- (ग्रुप स्टेज)- (Asia Cup 2025 Full Schedule, Match Dates, Venues)

9 सप्टेंबर (मंगळवार) : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध युएई
11 सप्टेंबर (गुरुवार) : बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर (शुक्रवार) : पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर (शनिवार) : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर (सोमवार) : श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर (मंगळवार) : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर (बुधवार) : पाकिस्तान विरुद्ध युएई
18 सप्टेंबर (गुरुवार) : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध ओमान

सुपर 4 सामन्यांचे वेळापत्रक-

20 सप्टेंबर (शनिवार) : ग्रुप बी क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2
21 सप्टेंबर (रविवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर 2
23 सप्टेंबर (मंगळवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2
24 सप्टेंबर (बुधवार) : गट ब पात्रता 1 विरुद्ध गट अ पात्रता 2
25 सप्टेंबर (गुरुवार) : गट अ पात्रता 2 विरुद्ध गट ब पात्रता 2
26 सप्टेंबर (शुक्रवार) : गट अ पात्रता 1 विरुद्ध गट ब पात्रता 1
28 सप्टेंबर (रविवार) : अंतिम सामना

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Asia Cup 2025 : आशिया कपच्या पत्रकार परिषदेतचं आक्रमकतेच्या मुद्यावरुन पहिली ठिणगी? भारत आणि पाकिस्तानचे कॅप्टन काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.