दुसऱ्या पत्नीने हडपले विम्याचे सात लाख! 12 वर्षांनंतर पहिल्या पत्नीकडून गुन्हा दाखल

पतीच्या अपघाती मृत्यूनंतर स्वतःला त्याची विधवा पत्नी म्हणून विमा रक्कम हडप करण्यासाठी खोटा दावा दाखल – केला. विमा कंपनीकडून मिळालेले – ६ लाख ९५ हजार रुपये हडप केले. या प्रकरणी पहिल्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रंजना सुनील पवार (३५, रा. टिळकनगर, वडारवाडा, ता. कन्नड) असे नुकसानभरपाई – हडप करणाऱ्या महिलेचे नाव असून तिच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड येथील वडारवाडा येथे राहणाऱ्या संगीता सुनील पवार – (४०) यांचा विवाह १० मे १९९६ रोजी सुनील पवार यांच्याशी झाला – होता. मात्र, पती सुनील व सासरच्या मंडळींनी दुचाकी व पैशांची मागणी केली. त्यानुसार, संगीताच्या वडिलांनी दुचाकी दिली, तसेच एक लाख रुपयेही दिले. तरी देखील त्यांनी तिचा छळ सुरुच ठेवला होता. त्यामुळे संगीता माहेरी गेल्या व या प्रकरणात कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने तिला व मुलगी पल्लवीला पोटगीही मंजूर केली आहे.

दरम्यान, पती-पत्नीचे नाते कायम असताना, सुनील पवार यांनी रंजना धनसु पिठे हिच्याशी बेकायदा दुसरा विवाह केला. या प्रकरणी संगीताने २००२ मध्ये डहाणू न्यायालयामार्फत गुन्हा दाखल केला होता. २० जानेवारी २०११ रोजी शिवराई फाटा येथे अपघातात सुनील पवार यांचा मृत्यू झाला. या अपघातात गुन्हा दाखल होऊन चौकशी सुरू होती. यावेळी सुनीलच्या मृत्यूनंतर, रंजना हिने स्वतःला कायदेशीर पत्नी असल्याचे भासवून नातेवाईकांच्या संगनमताने मोटार अपघात प्राधिकरणात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. या दाव्यात खोटे शपथपत्र दाखल केले. १९ जुलै २०१३ रोजी न्यायालयाने आदेश देत चोलामंडल एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनीकडून ६ लाख ९५ हजार रुपये व त्यावरील ९ टक्के व्याज रक्कम मंजूर केली. ही रक्कम रंजना हिने स्वतःकडे घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार २२ जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायालयातून प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर संगीता पवार यांच्या लक्षात आला. तिचा व मुलगी पल्लवीचा वारसाहक्क नाकारून खोट्या पद्धतीने रक्कम लाटली आहे. या पार्श्वभूमीवर संगीता पवार यांनी रंजना धनसू पिठे उर्फ रंजना सुनील पवार (रा. शनिमंदिर, टिळकनगर, वडारवाडा, कन्नड) हिच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Comments are closed.