Gen Z चा नवा क्रश ‘Book Boyfriend’, जाणून घ्या काय आहे हा नवा ट्रेंड

आजच्या सोशल मीडिया युगात नवनवीन रिलेशनशिप ट्रेंड्स समोर येत असतात. यामध्ये अलीकडेच चर्चेत असलेला ट्रेंड म्हणजे ‘बुक बॉयफ्रेंड’. पिढी वाचनापासून दुरावली आहे अशी धारणा असताना जनरेशन झेडने ती मोडून काढली आहे. उलट आता ते पुस्तकांमधील काल्पनिक नायकांना आपले क्रश मानू लागले आहेत. विशेष म्हणजे, हा ट्रेंड केवळ वाचनापुरता मर्यादित नसून डेटिंग बायो, सोशल मीडिया पोस्ट आणि रिलेशनशिप गोल्समध्येही दिसून येतो. (genz book boyfriend trend 2025)

बुक बॉयफ्रेंड म्हणजे नेमकं काय?

‘बुक बॉयफ्रेंड’ म्हणजे कादंबरी किंवा रोमँटिक कथांमध्ये दिसणारे काल्पनिक पात्र, जे वाचकांच्या मनात आदर्श प्रियकरासारखे स्थान निर्माण करतात. कुणासाठी तो पावसात हात धरून फिरणारा नायक असतो, तर कुणासाठी तो पुस्तकांच्या दुकानात पहिली भेट घडवणारा हिरो असतो. या पात्रांचे गुण समजूतदारपणा, निष्ठा, संवेदनशीलता हेच आजच्या तरुणाईला भावतात.

आकडेवारी काय सांगते?

टिंडरच्या अहवालानुसार, भारतात 2024 ते 2025 दरम्यान डेटिंग बायोमध्ये ‘बुकस्टोअर’चा उल्लेख दुप्पट झाला आहे. जागतिक पातळीवर जानेवारी 2025 मध्ये ‘बुक बॉयफ्रेंड’चा उल्लेख 77% ने वाढल्याचे दिसून आले. हे स्पष्टपणे दाखवते की पुस्तके आता केवळ छंद राहिलेले नाहीत, तर नातेसंबंधांच्या अपेक्षा घडवणारे माध्यम बनले आहेत.

Gen Z ला का आवडतो हा ट्रेंड?

1.भावनिक मोकळेपणा: ही पिढी भावना दडपून न ठेवता व्यक्त करण्याला महत्त्व देते.

2.समजूतदार आणि निष्ठावान नायक: नातेसंबंध दीर्घकाळ टिकावेत यासाठी हे गुण आवश्यक आहेत.

3.फॅन्टसी + रिअ‍ॅलिटीचा संगम: काल्पनिक पात्रांच्या आदर्श गुणांना प्रत्यक्ष आयुष्यात शोधण्याची इच्छा.

सोशल मीडियावरील मजेदार पोस्ट्स

सोशल मीडियावर चर्चेत असलेली उदाहरणं बघायचं झालं तर काही वापरकर्ते आपल्या बायोमध्ये लिहीत आहेत  “पुस्तके > मुले (पण वाटाघाटी होऊ शकते)” “माझ्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे पुस्तकांच्या दुकानात भेट.”

“पावसात जुन्या पुस्तकांचा वास आणि तुझी सोबत परफेक्ट डेट!”

‘बुक बॉयफ्रेंड’ हा ट्रेंड दाखवतो की जनरेशन झेड केवळ स्क्रीनमध्ये अडकून नाही तर साहित्यामध्येही स्वतःची ओळख आणि भावनिक कनेक्शन शोधत आहेत. त्यामुळेच हा ट्रेंड त्यांच्या रिलेशनशिप जगात एक नवा आयाम आणतोय.

Comments are closed.