रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई, क्लास वन अधिकाऱ्यासह शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं
रत्नागीरी गुन्हा: रत्नागिरीत गुरुवारी रात्री (11 सप्टेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील वर्ग-1 अधिकारी, जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला 16,500 रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
लेखापरीक्षण अहवालातून मुद्दे वगळण्यासाठी लाच
दापोली पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून काम करणाऱ्या 55 वर्षीय अधिकाऱ्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या कार्यालयाचे सन 2020-21 आणि 2021-22 या दोन आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरीमार्फत झाले होते. या तपासणीत 21 आक्षेप नोंदवले गेले होते. त्यानंतर तक्रारदार अधिकाऱ्यांनी सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण देऊन 5 ऑगस्ट 2025 रोजी अनुपालन अहवाल सादर केला.
या प्रकरणी अंतिम अहवाल काढून घेण्यासाठी तक्रारदार 5 ऑगस्ट रोजी सहाय्यक संचालक शरद जाधव आणि कंत्राटी शिपाई सतेज घवाळी यांना भेटले. त्या वेळी, सर्व 21 आक्षेप वगळून अंतिम अहवाल तयार करून देण्यासाठी जाधव यांच्या सांगण्यावरून घवाळीने 24,000 रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.
तीन लोकसेवक एकाचवेळी अटकेत
या कारवाईत स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक (वर्ग-१) शरद रघुनाथ जाधव, जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये, आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. एकाच वेळी तीन लोकसेवकांना अटक झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
एसीबीची कारवाई
तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली होती. एसीबीने सापळा रचून गुरुवारी रात्री ही कारवाई केली. जाधव, शेट्ये आणि घवाळी या तिघांकडून तक्रारदाराकडून घेतलेले पैसे जप्त करण्यात आले आहेत. आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा लाच प्रकरणात सहभाग असल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे.
कणकवली हादरली, दारुड्या मुलाने आईच्या डोक्यात कोयता घातला अन्
दारूच्या नशेमध्ये मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी घडली. प्रभावती सोरफ या 80 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा रवींद्र सोरफ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे (Murder news) कणकवलीत एकच खळबळ उडाली आहे. तसेच वृद्ध महिलेल्या मृत्युविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kankavli News)
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.