भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तर कधीतरी नेपाळ होणारच! संजय राऊत कडाडले, मिंध्यांची सालटी काढली

भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच, असा सावधगिरीचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत दिला. या विधानानंतर महाराष्ट्रात मिंधे गटाने राऊत यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. याचा संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करून खरपूस समाचार घेतला आहे. नेपाळच्या तरुणांनी क्रांतीचा मार्ग दाखवला. भ्रष्ट शासन कर्त्याना रस्त्यावर आणले. त्यामुळे एकजात सगळे मिंधे लोक घाबरणारच! ये डर अच्छा है! अशा शब्दात संजय राऊत यांनी मिंध्यांची सालटी काढली.
संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “महाराष्ट्रात आणि देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नेपाळी तरुणांचा लढा भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरुद्ध असल्याचे मी सांगताच महाराष्ट्रात मिंधे गटाने माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आज हेच मूर्ख लोक पोलीस आयुक्तांना भेटून माझ्यावर कारवाईची मागणी करत आहेत; खुशाल करा अशी मागणी! हे लोक घाबरले आहेत! भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच, ये डर अच्छा है!”, असे संजय राऊत म्हणाले.
सावधान! अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते; नेपाळमधील अराजकतेवरून संजय राऊत यांचा इशारा
तसेच नेपाळच्या तरुणांनी क्रांतीचा मार्ग दाखवला. भ्रष्ट शासन कर्त्याना रस्त्यावर आणले. त्यामुळे एकजात सगळे मिंधे लोक घाबरणारच! असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मिंधे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बीजेपी मुंबईलाही टॅग केले आहे.
महाराष्ट्रात आणि देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते,
नेपाळी तरुणांचा लढा भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरुद्ध असल्याचे मी सांगताच महाराष्ट्रात मिंधे गटाने माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली,
आज हेच मूर्ख लोक पोलिस आयुक्ताना भेटून माझ्यावर कारवाईची मागणी करत आहेत;
खुशाल… pic.twitter.com/3idgchutbx– संजय राऊत (@राउत्सनजे 61) 12 सप्टेंबर, 2025
Comments are closed.